केडीएमसी तर्फे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त भावपूर्ण आदरांजली

06 Dec 2025 18:54:30
Dr. Babasaheb Ambedkar
 
कल्याण : ( Dr. Babasaheb Ambedkar ) भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त कल्याण डोंबिवली महानगरपालिकेतर्फे शनिवारी भावपूर्ण आदरांजली वाहण्यात आली.
 
कल्याण (प.) येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यानातील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास महापालिका आयुक्त अभिनव गोयल यांनी पुष्पहार अर्पण करुन आदरांजली वाहिली. या समय‍ी अति.आयुक्त हर्षल गायकवाड, शहर अभियंता अनिता परदेशी, माजी महापौर रमेश जाधव, महापालिका सचिव किशोर शेळके, उपायुक्त संजय जाधव, कार्यकारी अभियंता रोहिणी लोकरे, संदिप तांबे,प्रशासन अधिकारी भारत बोरनारे, सहा.आयुक्त धनंजय थोरात, माजी पालिका सदस्य भीमराव डोळस, माहिती व जनसंपर्क अधिकारी माधवी पोफळे, तसेच इतर अधिकारी,कर्मचारी व अनेक नागरिक उपस्थित होते.
 
महापालिका मुख्यालयातही महापालिका आयुक्त अभिनव गोयल यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली. या समय‍ी अति.आयुक्त हर्षल गायकवाड, शहर अभियंता अनिता परदेशी, मुख्य लेखा परिक्षक सुरेश बनसोडे, महापालिका सचिव किशोर शेळके, उपायुक्त समीर भुमकर, संजय जाधव, प्रशासन अधिकारी भारत बोरनारे, माहिती व जनसंपर्क अधिकारी माधवी पोफळे तसेच इतर अधिकारी व कर्मचारी वर्ग यांनी देखील पुष्पसुमने अर्पण करून आदरांजली वाहिली.
 
डोंबिवली विभागीय कार्यालयालगतच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुर्णाकृती पुतळयास तसेच फ प्रभाग कार्यालयातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस अति.आयुक्त योगेश गोडसे यांनी पुष्पहार अर्पण करुन आदरांजली वाहिली. या समयी सहा.आयुक्त प्रसाद ठाकुर, उदयान अधिक्षक महेश देशपांडे तसेच इतर अधिकारी, कर्मचारी वर्ग व नागरिक उपस्थित होते.
महापालिकेच्या ड प्रभागातही उपायुक्त प्रसाद बोरकर यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळयास पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. यासमयी सहा.आयुक्त उमेश यमगर इतर अधिकारी, कर्मचारी वर्ग व नागरिक उपस्थित होते.
 
 
Powered By Sangraha 9.0