मुंबई : (Reserve Bank of India) भारतीय रिझर्व्ह बँकेच्या (Reserve Bank of India) सहा सदस्यीय पतधोरण समितीने रेपो दरात २५ आधार अंकांची घट करत ५.२५ टक्के करण्याचा निर्णय घेतला. येत्या सहा ते नऊ महिन्यांच्या काळात महागाई आटोक्यात राहिल, असा अंदाज समितीने व्यक्त केला. सध्याचा दर हा गेल्या तीन वर्षांतील सर्वात कमी दर आहे. आरबीआयच्या (Reserve Bank of India) या निर्णयाचा गृहकर्ज आणि वाहनकर्ज घेणाऱ्या सर्वसामान्य ग्राहकांना लाभ घेता येणार आहे. मध्यवर्ती बँकेने खुल्या बाजारातील व्यवहारांद्वारे १ लाख कोटी रुपयांची तरलता टीकवण्यासाठी तीन वर्षांत पाच अब्ज डॉलर्सच्या डॉलर-रुपया खरेदी विक्री स्वॅपची घोषणा केली आहे. याच महिन्यात हा व्यवहार सुरू केला जाणार असल्याची माहितीही बँकेने दिली आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर संजय मल्होत्रा म्हणाले की, “पतधोरण समितीच्या पाहणीत महागाईत लक्षणीय घट झाल्याची नोंद करण्यात आली. पूर्वीच्या तुलनेत हा आणखी कमी होईल, अशी शक्यता आहे. समितीने यावर्षांत एकूण १२५ आधार अंकांची घट केली आहे.” (Reserve Bank of India)
हेही वाचा : Kirit Somaiya : डॉ. किरीट सोमय्या लिखित ‘बांगलादेशी घुसखोर जन्मप्रमाणपत्र घोटाळा’ पुस्तकाचे प्रकाशन
आरबीआयने (Reserve Bank of India) चालू आर्थिक वर्षात महागाई दर घटवत दोन टक्क्यांवर आणला आहे. याच वर्षासाठी ऑक्टोबरमध्ये तो २.६ टक्के अनुमान लावण्यात आला होता. पुढील आर्थिक वर्षांतील पहिल्या तिमाहीतील महागाई दर हा ४.५ टक्क्यांवरुन ३.९ टक्के इतका करण्यात आला. पुढील काळातील दर कपातीवर मल्होत्रा म्हणाले की, “महागाई आटोक्यात असेल असा आमचा अंदाज आहे. भविष्यात याबद्दलचा निर्णय त्यावेळच्या आकडेवारीवर अवलंबून असेल,”असे त्यांनी सांगितले. आरबीआयच्या गव्हर्नर यांच्या मते, “वृद्धी दर मजबूत स्थितीत असला तरीही येत्या वर्षात काही नाजूक स्थिती असण्याची शक्यता आहे. मात्र, चालू आर्थिक वर्षातील वृद्धी ६.८ टक्क्यांनी वाढवत ७.२ टक्के इतकी करण्यात आली आहे. भांडवली बाजारानेही रिझर्व्ह बँकेच्या निर्णयाचे त्यांनी स्वागत केले. सेन्सेक्स ८४ हजार ७१२.३७ अंकावर बंद झाला. रेपोदरातील कपात आणि ओएलओच्या लिलावाच्या घोषणानंतर बॉण्ड लील्डमध्ये घसरण धाली. भारतीय स्टेट बँकेचे समूह मुख्य आर्थिक सल्लागार सौम्य कांति घोष यांच्या मते, “महागाई आटोक्यात आणण्याच्या प्रयत्नात आरबीआयने भविष्यात दर कपातीचे पर्याय खुले ठेवले आहेत. ५.२५ टक्के रेपो दर हे दीर्घकाळ राहू शकत नाही. आरबीआयची पतधोरण बैठक ४ ते ६ फेब्रुवारी २०२६ रोजी पार पडणार आहे. (Reserve Bank of India)