मुंबई : (Chunabhatti Sion Protest) गेल्या काही तासांपासून चुनाभट्टी- शीव कनेक्टर मार्गावर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अनुयायींकडून मोठ्या प्रमाणात रस्ता रोको करण्यात आला आहे. आज ६ डिसेंबर डॉ. बाबासाहेब आंबडेकर महापरिर्निवाण दिन (Chunabhatti Sion Protest), आजच्या दिवशी राज्यभरातून मोठ्याप्रमाणात भीम अनुयायी दादर चैत्यभूमीवर जमा होतात. यातच आता काही अनुयायी रिक्षाने दादर गाठायच्या प्रयत्नात होते. मात्र दक्षिण मुंबईमध्ये रिक्षावर निर्बंध असल्यामुळे मुंबई पोलिसांकडून त्यांना अडवण्यात आलं, त्यानंतर आता हा रस्ता रोकोचा प्रकार सुरू झाला आहे. (Chunabhatti Sion Protest)
हेही वाचा : Uday Samant : गुजरातने आता चक्क हापूस आंबा त्यांचा असल्याचा दावा केलाय! यावर मंत्री उदय सामंत काय म्हणाले?
दरम्यान, माध्यमांवरून मिळालेल्या माहितीनुसार, यामुळे गेल्या तीन तासांपासून शीवकडून दादरला (Chunabhatti Sion Protest) येणार्या मार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली आहे. ज्यामुळे नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. त्यासोबतच या आंदोलना दरम्यान, एका पोलीस कर्माचाऱ्याच्या पायावरून एका भीम अनुयायीने दुचाकी नेण्याचा प्रकार देखील घडला आहे. (Chunabhatti Sion Protest)
समोर आलेल्या माहितीनुसार, पोलीस कर्मचारी भीम अनुयायींच्या इतर गाड्या पुढे सोडत असताना देखील काही लोक रिक्षाने जाण्याचा प्रयत्न करत होते. पोलीसांनी त्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला असता, त्यांच्याकडून रस्ता अडवत आंदोलन सुरू करण्यात आले. (Chunabhatti Sion Protest)