मुंबई : (Babasaheb Ambedkar Mahaparinirvan Din) डॉ. बाबासाहेब आंबडेकर महापरिर्निवाण दिनानिमित्त आज दादर येथील चैत्यभूमीवर बाबासाहेबांच्या अनुयायांचा जनसागर उसळला आहे. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून मोठ्या संख्येने आंबेडकरांचे अनुयायी चैत्यभूमीवर दाखल झाले आहेत. त्यानिमित्तानेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही शनिवारी चैत्यभूमीवर जाऊन बाबासाहेब आंबेडकर यांना आदरांजली वाहिली. मात्र यानंतर प्रसार माध्यमांसोबत झालेल्या संवादात, पुढच्या वर्षभरात इंदू मिलमधील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाचे लोकार्पण करण्याचा मानस असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले आहे. (Babasaheb Ambedkar Mahaparinirvan Din)
हेही वाचा : CM Devendra Fadnavis : महावितरणचा सौर कृषीपंप योजनेत महाविश्वविक्रम, महाराष्ट्र आता थांबणार नाही असाच पुढे जात राहील !
माध्यमांशी बोलताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, "पुढच्या वर्षभरात इंदू मिलमधील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाचे लोकार्पण करण्याचा आपला मानस आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचं स्मारक हे पुढील महापरिनिर्वाण दिनापर्यंत पूर्ण करण्यात येईल. यामध्ये ३५० फूट उंचीचा त्यांचा पुतळा असेल. हे स्मारक डिसेंबर २०२६ पर्यंत पूर्ण करण्याचा प्रयत्न करणार असेल." (Babasaheb Ambedkar Mahaparinirvan Din)
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या इंदू मिल येथील स्मारकाचे ५० टक्के काम पूर्ण झाले आहे. सध्या पुतळ्याच्या पायथ्याचे आणि आर्मेचर फॅब्रिकेशनचे काम सुरू आहे. या पुतळ्यात सहा हजार टन पोलाद आणि काही प्रमाणात कांस्य धातूचा वापर केला जाणार आहे. (Babasaheb Ambedkar Mahaparinirvan Din)