CM Devendra Fadnavis : अनाथ मुलांना आरक्षण देण्याचा निर्णय सर्वात समाधान देणारा

05 Dec 2025 19:52:22
CM Devendra Fadnavis
 
मुंबई : (CM Devendra Fadnavis) अनाथ मुलांना आरक्षण देण्याचा निर्णय हा माझ्या जीवनातील सर्वात समाधान देणारा निर्णय आहे. शासनाच्या वर्षपूर्तीची सुरुवात सुंदर कार्यक्रमाने झाली, असे प्रतिपादन मुख्यमंत्री फडणवीस यांनी केले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांनी वर्षा निवासस्थानी आरक्षणाचा लाभ घेऊन शासकीय सेवेत रुजू झालेल्या अनाथ मुलांशी संवाद साधला. (CM Devendra Fadnavis)
 
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) म्हणाले की, “भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी मांडलेल्या ‘संधीची समानता’ या तत्त्वाच्या प्रेरणेने राज्य शासनाने १ टक्का अनाथ आरक्षणाचा निर्णय घेतला आहे, या निर्णयामुळे ८६२ अनाथ युवक-युवती स्वावलंबी होऊन समाजासाठी कार्यरत असल्याचा अभिमान वाटतो. आज मलाही मुख्यमंत्रीपदाची (CM Devendra Fadnavis) शपथ घेऊन वर्ष झाले. या वर्षपूर्तीची सुरुवातप्रसंगी अतिशय सुंदर कार्यक्रमाने झाली. निःशब्द भाव खूप बोलणारा असतो, तसा भाव आज माझ्या मनात आहे. शासनात अनेक निर्णय घेतले जातात, अनेक कामे केली जातात, पण काही निर्णय मनाला गहिवर देतात. तसाच अनाथ मुलांना आरक्षण देण्याचा निर्णय आहे.” (CM Devendra Fadnavis)
 
हेही वाचा : Arun Govil : मशिदी-मदरशांमध्येही सीसीटिव्ही कॅमेरे बसवा  
 
संघर्षातून पुढे आलेल्या युवकांनी समाजाचे 'रोल मॉडेल' व्हावे
 
“आपण जे काही साध्य करतो, ते समाजाने निर्माण केलेल्या व्यवस्थेमुळे शक्य होते. शाळा, संस्था, शासनव्यवस्था, उद्योग हे सर्व समाजाच्या सामूहिक प्रयत्नांचे फळ आहे. त्यामुळे या समाजाला परत काहीतरी देणे, हा प्रत्येकाचा धर्म आहे. संघर्षातून पुढे आलेले हे युवक समाजात ‘रोल मॉडेल’ बनावेत. जिथे पोहोचलात तिथे थांबू नका. संघर्षातून मिळवलेले यश हे पुढे समाजासाठी अविरत कार्य करण्याची प्रेरणा ठरावी. स्थैर्य मिळाल्यानंतरही समाजासाठी काहीतरी देण्याची भावना मनात कायम ठेवावी,” असे ते म्हणाले. माणसाचे कार्यच त्याला अमरत्व देते. कार्यातूनच माणूस जिवंत राहतो. म्हणून तुमचे कार्यच तुमची ओळख बनवा, असेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. (CM Devendra Fadnavis)
 
Powered By Sangraha 9.0