Arun Govil : मशिदी-मदरशांमध्येही सीसीटिव्ही कॅमेरे बसवा

05 Dec 2025 19:35:49
Arun Govil
 
मुंबई : (Arun Govil) मेरठचे भाजप खासदार अरुण गोविल (Arun Govil) यांनी संसदेत एक महत्त्वाचा मुद्दा उपस्थित केला. त्यांनी आपल्या उद्बोधनातून मशीद आणि मदरशांमध्ये सीसीटिव्ही कॅमेरे बसवावेत, अशी मागणी केली. अरुण गोविल (Arun Govil) म्हणाले की, देशातील सुरक्षा ही आता पर्याय नसून अत्यावश्यक गरज बनली आहे. मंदिरांमध्ये, गुरुद्वारांमध्ये, चर्चमध्ये, कॉलेजमध्ये आणि इतर सार्वजनिक ठिकाणी कॅमेरे बसवले जात असताना मशीद आणि मदरशांना त्यातून वेगळे का ठेवले जाते? असा थेट सवाल त्यांनी केलाय.(Arun Govil)
 
अरुण गोविल (Arun Govil) यांनी स्पष्ट केले की, त्यांचा हेतू कोणत्याही धर्माला लक्ष्य करणे नाही, तर सर्व नागरिकांची सुरक्षा सुनिश्चित करणे आहे. दररोज मोठ्या संख्येने लोक मशीद आणि मदरशांमध्ये ये-जा करतात, त्यामुळे इतर सार्वजनिक ठिकाणांप्रमाणेच तेथेही सीसीटिव्हीची व्यवस्था असणे तितकेच आवश्यक आहे.(Arun Govil)
 
हेही वाचा : RELOS Agreement : रेलोस कराराच्या मंजुरीने भारत-रशिया सैन्य सहकार्याला बळकटी   
 
मक्का मदिनाचे उदाहरण सांगत ते म्हणाले की, इस्लामचे केंद्र असलेल्या मक्का मदिनात तसेच सौदी अरेबियातील अनेक मदरशांमध्ये सुरक्षेच्या कारणास्तव सीसीटिव्ही कॅमेरे बसवलेले आहेत. जर तेथे धार्मिक भावना दुखावल्या न जाता अशी व्यवस्था लागू होऊ शकते, तर भारतात का नाही? त्यामुळे सर्व धार्मिक आणि सार्वजनिक स्थळांवर एकसमान राष्ट्रीय सुरक्षा धोरण राबवणे आवश्यक आहे. जेणेकरून देशाची सुरक्षा व्यवस्था अधिक मजबूत होईल आणि गुन्हेगारी रोखण्यासही मदत मिळेल.(Arun Govil)
 
 
Powered By Sangraha 9.0