मुंबई : ( Rahul Vaidya ) देशांतर्गत विमान प्रवासासाठी लोकप्रिय असलेल्या इंडिगो एअरलाइन्सच्या उड्डाण रद्द केल्यामुळे प्रवाशांना मोठा फटका बसला आहे. अनेक उड्डाण रद्द केल्यामुळे प्रवाशांना जास्त पैसे मोजून दुसऱ्या विमान कंपनीचे तिकीट खरेदी करावे लागत आहेत. याचाच फटका आता लोकप्रिय मराठमोळा गायक राहुल वैद्य यालाही बसला आहे.
गोवा ते मुंबई प्रवास करत असताना, कोलकाता इथे एका नियोजित कार्यक्रमासाठी जात असताना, राहुलने एक थकलेला सेल्फी इंस्टाग्राम स्टोरीवर शेअर केला यात त्याने असे लिहीले की, "प्रवासासाठी हा एक वाईट दिवस आहे! आणि आज रात्री कोलकाता इथे आमचा शो आहे... आणि आम्हाला तिथं कसे पोहोचायचं हे अजूनही माहित नाही." त्यानंतर त्याने पुढील स्टोरीत अनेक बोर्डिंग पास दाखवले आणि धक्कादायक खुलासा केला की, देशांतर्गत विमान प्रवास करण्यासाठी त्याने तब्बल ४.२ लाख खर्च केले.
हे बोर्डिंग पास ४.२ लाखांचे आहेत आणि ते फक्त गोवा ते मुंबईपर्यंतचे आहेत… आणि आता मुंबई ते कोलकाता वेगळे असतील. हा माझा आतापर्यंतचा सर्वात महागडा देशांतर्गत प्रवास आहे, असेही त्याने सांगीतले. एका वेगळ्या पोस्टमध्ये त्यानं लिहिलंय की, " इंडिगो एअरलाइन्स , तुम्ही किती वाईट आहात हे जवळजवळ कळालंय आहे! शब्द नाहीत!" इंडिगो एअरलाइन्सच्या उड्डाण रद्द केल्यामुळे त्यांनी माफी मागितली असली तरी, आता यामुळे प्रवाशांमध्ये नाराजी कायम आहे.