BJP : सुरूवात आम्ही केली नाही , मात्र ही शांत बसणारी भाजपा नाही

    04-Dec-2025   
Total Views |
BJP
 
डोंबिवली : (BJP) फोडाफोडीची सुरुवात आम्ही केली नसून तुम्ही एक घ्याल तर आम्ही चार घेऊ. ही शांत बसणारी भाजपा  (BJP) नाही, अशा शब्दांत भाजपाकडून शिवसेनेवर पलटवार करण्यात आला आहे.
 
भाजपाने शिवसेना आमदार राजेश मोरे यांचा निकटवर्तीय विकास देसले यांचा बुधवारी पक्ष प्रवेश केला. त्या प्रवेशावर शिवसेनेकडून पत्रकार परिषद घेत नाराजी व्यक्त करण्यात आली. त्याला भाजपाकडून प्रतिउत्तर देण्यात आले. भाजपा (BJP) जिल्हाध्यक्ष नंदू परब यांनी पत्रकार परिषद घेत उपरोक्त पलटवार केला आहे. यावेळी डोंबिवली पूर्व मंडल अध्यक्ष मितेश पेणकर, संदीप माळी, कर्ण जाधव आदी मान्यवर उपस्थित होते.
 
हेही वाचा : Maharashtra Seva Sangh : महाराष्ट्र सेवा संघाच्यावतीने सामाजिक संस्था पुरस्कार प्रदान सोहळ्याचे आयोजन  
 
संपूर्ण तारीखेनिशी पक्ष प्रवेशाच्या घडामोडीची माहिती देत नंदू परब यांनी सांगितले, सुरूवात आम्ही नाही तर तुम्ही केली. युती धर्म पाळण्याची जबाबदारी केवळ आमचीच आहे का? आतापर्यंत आम्ही त्यांचे पालन करत आलो होतो. मात्र आधी उल्हासनगर आणि नंतर मग अंबरनाथ मध्ये आमच्या पक्षाचे पदाधिकारी आणि आपल्या पक्षात घेऊन त्यांनीच त्यांचे उल्लंघन केले आहे. त्यावर मग आम्ही खासदार साहेबांचा निषेध करायचा का? असा सवाल ही त्यांनी उपस्थित केला. (BJP)
 
भाजपा (BJP) हा शिस्तबद्ध पक्ष असून आम्ही पहिली चूक, दुसरी चूक माफ केली. मात्र तिसऱ्या चुकीला माफी नाही असा इशारा वजा सल्ला दिला. तसेच मैत्रीत आम्ही पहिला घाव करत नाही. पण आता हातावर हात ठेवून शांत बसणारी भाजपा (BJP) राहिलेली नाही. तुम्ही दगड मारला तर आम्ही ही जशास तसे उत्तर देऊ अशा शब्दांत नंदू परब यांनी शिवसेनेला इशारा दिला आहे.
 
दरम्यान आजच्या पक्ष प्रवेशानंतर भाजपा (BJP) जिल्हाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी आपल्याला फोन करत आजच्या प्रवेशाबाबत विचारणा केल्याचे सांगत या पुढील पक्षप्रवेश आपल्याला विचारुन करण्याचे निर्देश दिल्याचे नंदू परब यांनी सांगितले. (BJP)