मुंबई (विशेष प्रतिनिधी) - बल्लारशाह-गोंदिया रेल्वे महामार्गावर गुरुवार दि. ४ डिसेंबर रोजी सांबराचा मृतदेह आढळून आला (chandrapur). गुरुवारी पहाटे रेल्वेच्या धडकेत या सांबराचा मृत्यू झाल्याची शक्यता वर्तवणिण्यात आली आहे (chandrapur). यानिमित्ताने पुन्हा एकदा बल्लारशाह-गोंदिया रेल्वे महामार्ग वन्यजीवांसाठी मृत्यूचा सापळा बनत असून यावर्षात या रेल्वे महामार्गावर एकूण १७ वन्यजीवांना रेल्वेच्या धडकेत आपले प्राण गमवावे लागले आहे (chandrapur).
बल्लारशाह - गोंदिया रुळावर मामला वनपरिक्षेत्रात कक्ष क्रमांक ४१३ मध्ये चंद्रपूर कडे येणाऱ्या पॅसेंजर रेल्वेच्या धडकेत मादी सांबराचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी पहाटे निदर्शनास आली. रस्ते अपघातात अज्ञात वाहणाच्या धडकेत भद्रावती हायवेवर पेट्रोल पंपजवळ नर चितळाचा आणि वरोरा येथे आनंदवन चौकाजवळ हायवेवर साळींदराचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या तिन्ही वन्यजीवांच्या मृत्यूची घटना एकाच दिवशी घडली आहे. बल्लारशाह - गोंदिया हा रेल्वे रुळ तर वन्यजिवांसाठी मृत्यूचा सापळा ठरलेला आहे. आत्तापर्यंत या रेल्वे महामार्गावर १७ वन्यजीवांचा रेल्वेच्या अपघातात मृत्यू झालाचे हॅबिटॅट काॅन्झर्वेशन सोसायटीचे अध्यक्ष दिनेश खाटे यांनी सांगितले. त्यात दोन वाघ, एक बिबट, तीन अस्वल, एक रानगवा, सहा सांबर, एक चितळ, एक हुमा घुबड, एक माकड आणि राजुराजवळ एका वाघाचा समावेश आहे.
बल्लारशाह- गोंदिया रेल्वे रुळावर उपशमन योजना राबविण्यासाठी नागपूर हायकोर्टात जनहित याचिका दाखल करण्यात आला आहे. भविष्यात या रुळावर वन्यजीवांसाठी लवकरच उपशमन योजना राबविण्यात येणे आवश्यक आहे. बल्लारशाह- गोंदिया रेल्वे रुळ हा महत्वपूर्ण वन्यजीव भ्रमणमार्गाला मोठा अडथळा असल्याने अनेक वन्यजीवांना जीव गमवावा लागला आहे. कावल व्याघ्र प्रकल्प - कन्हाळगाव अभयारण्य - ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प- उमरेड- कऱ्हाणंडला जोडणाऱ्या वन्यजीव भ्रमनमार्गाला छेदून हा रेल्वेमार्ग जातो. त्यामुळे वन्यजीवांचा हा भ्रमनमार्ग सुरक्षित करणे अत्यंत गरजेचे झाले आहे. भारतीय रेल्वे प्रशासन वन्यजीवांचे मृत्यू रोखण्यासाठी अंडरपास, नॉइज बॅरियर, लाईट बॅरियर, रबराइज्ड मॅट्स, इलेक्ट्रोमॅट्स आणि घुसखोरी शोध प्रणाली यासारख्या इतर उपायांकडे आत्तापर्यंत दुर्लक्ष करत रेल्वे महामार्गावर कुंपण घालत आहे.