मुंबई : (Gita Jayanti) मध्यप्रदेशातल्या बारघाट तालुक्यातील अरी येथील सरकारी उच्च माध्यमिक शाळेत गीता जयंतीदिनी (Gita Jayanti) विद्यार्थ्यांना १६ वेळा 'अल्लाह हू अकबर' म्हणायला लावल्याचे प्रकरण समोर आले आहे. याप्रकरणी शाळेच्या प्रभारी मुख्याध्यापिका प्रतीक्षा मंगडे यांच्यावर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. या घटनेनंतर विश्व हिंदू परिषदेसह अनेक हिंदू संघटनांनी बंद पुकारला होता. (Gita Jayanti)
मिळालेल्या माहितीनुसार, विश्व हिंदू परिषदेचे कार्यकर्ते अरी पोलीस ठाण्यात पोहोचले आणि त्यांनी या संदर्भात सविस्तर निवेदन सादर केले. पोलीस स्टेशनमध्ये तैनात असलेले ए. एस. आय. शैलेंद्र तिवारी यांनी निवेदन स्वीकारले आणि पुढील कारवाईचे आश्वासन दिले. (Gita Jayanti)
हेही वाचा : Growing Islamization in Japan : जपानमधील वाढते इस्लामिकरण चिंताजनक
काय आहे संपूर्ण प्रकरण?
मिळालेल्या माहितीनुसार, १ डिसेंबरला शाळेच्या आवारात गीता जयंती (Gita Jayanti) साजरी करण्यात आली. या वेळी प्रभारी मुख्याध्यापकांनी हिंदू विद्यार्थ्यांना १६ वेळा 'अल्लाह हू अकबर' म्हणायला लावले. घटना उघडकीस आल्यानंतर स्थानिक हिंदू समाजाच्या धार्मिक भावना तीव्र दुखावल्या गेल्या. शाळेच्या मुख्याध्यापिका यांचे सोशल मीडिया तपासले असता त्या सतत हिंदूविरोधी पोस्ट शेअर करतात असे आढळले. (Gita Jayanti)
एफआयआरची मागणी, अन्यथा हिंसक आंदोलन
विश्व हिंदू परिषदेने या संदर्भात पोलिसात तक्रार दाखल केली आहे. आरोपी प्रभारी मुख्याध्यापिका श्रीमती प्रतीक्षा मंगडे यांच्याविरोधात त्वरित एफआयआर नोंदवला जावा. वेळेवर कारवाई न केल्यास संघटनेला आक्रमक आंदोलन करण्यास भाग पाडले जाईल, असा इशाराही विहिंपने दिला आहे. (Gita Jayanti)
बारामती येथील तुळजाराम चतुरचंद महाविद्यालयात वाणिज्य विषयामध्ये पदवीचे शिक्षण. पुण्यातील रानडे इन्स्टिट्यूट येथून संज्ञापण आणि वृत्तपत्रविद्येमध्ये पदव्युत्तर पदवी. अनेक राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धांमध्ये सहभाग. रानडे इन्स्टिट्यूट येथे 'पश्चिम महाराष्ट्रातील वक्तृत्व स्पर्धांची परंपरा, समस्या आणि परिणाम' या विषयात सखोल अहवाल सादर. सध्या मुंबई तरुण भारत येथे पत्रकार म्हणून कार्यरत.