Shri Guru Tegh Bahadur Sahib Ji : हिंद-की-चादर श्री गुरु तेग बहादुर साहिब जी यांच्या ३५० व्या शहिदी समागम शताब्दी

    04-Dec-2025
Total Views |
Shri Guru Tegh Bahadur Sahib Ji
 
ठाणे : (Shri Guru Tegh Bahadur Sahib Ji) हिंद-की-चादर श्री गुरु तेग बहादूर साहिब जी यांच्या ३५० व्या शहिदी समागम शताब्दी कार्यक्रमानिमित्त महाराष्ट्र शासन व गुरू नानक नाम लेवा संगत (सिख, सिखलकर, बंजारा, लबाना, सिंधी व मोहियाल) समाजामार्फत राज्यात नांदेड, नागपूर व खारघर, नवी मुंबई (रायगड) या तीन ठिकाणी ऐतिहासिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे. (Shri Guru Tegh Bahadur Sahib Ji)
 
हा कार्यक्रम तळागाळातील जनतेपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न असून सीख, सिकलकर, बंजारा, लबाना, सिंधी व मोहियाल समाजांचे श्री गुरू तेग बहादूर साहबजी यांच्याशी असलेले ऐतिहासिक नाते संबंधित अधिक दृढ होऊन राष्ट्रीय, सामाजिक व धार्मिक ऐक्य वृध्दींगत करण्याचा प्रयत्न या माध्यमातून करण्यात येणार आहे. (Shri Guru Tegh Bahadur Sahib Ji)
 
हेही वाचा :  IndiGo Flight Cancellations Updates : इंडिगो संकटात! एका दिवसात तब्बल १०० हून अधिक उड्डाणे रद्द, अनेक प्रमुख विमानतळांवर प्रवाश्यांची गर्दी
 
यानुषंगाने नागपूर येथील जरीपटका पोलीस स्टेशन रोड, सुरेंद्र चंद्र सूत्री ग्राऊंड, खसरा नंबर १६८, नारा येथे दि.7 डिसेंबर 2025 रोजी सकाळी 9 ते रात्री 10 या कालावधीत शहिदी समागमचे आयोजन करण्यात येत आहे. या कार्यक्रमास उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची प्रमुख उपस्थिती असणार असून सीख, सिकलकर, बंजारा, लबाना, सिंधी व मोहिवाल आणि अन्य सर्व समाजांचे समाजबांधव देखील लाखोंच्या संख्येने उपस्थित राहणार आहेत. (Shri Guru Tegh Bahadur Sahib Ji)
 
तरी या ऐतिहासिक शहिदी समागम कार्यक्रमास ठाणे जिल्हयातील सीख, सिकलकर, बंजारा, लबाना,सिंधी व मोहियाल या समाजातील सर्व समाजबांधवाना उपस्थित राहण्याकरिता आवाहन करण्यात येत आहे. (Shri Guru Tegh Bahadur Sahib Ji)