Thiruparankaundram Hill Controversy : थिरुपरनकुंड्रम टेकडीवर हिंदूंना दीप पेटवण्यास विरोध

मद्रास हायकोर्टाच्या निर्णयाचा राज्य सरकारकडून अवमान; हिंदू संघटना आक्रमक

Total Views |
Thiruparankaundram hill controversy 
 
मुंबई : (Thiruparankaundram Hill Controversy) थिरुपरनकुंड्रम टेकडीवर (Thiruparankaundram Hill Controversy) हिंदूंना दीप पेटवण्यास विरोध केल्याने हिंदू संघटना आणि पोलिसांत हिंसाचार झाला. मद्रास हायकोर्टाच्या मदुराई खंडपीठाने आदेश दिला होता की, थिरुपरनकुंड्रम टेकडीवरील (Thiruparankaundram Hill Controversy) दीपथून या प्राचीन दगडी स्तंभावर दीप प्रज्वलित केला जावा आणि या प्रक्रियेसाठी सीआयएसएफ सुरक्षा पुरवण्यात यावी. मात्र राज्य सरकारने या निर्णयाचा अवमान केल्याने मोठा तणाव निर्माण झाला. यामध्ये दोन पोलिस जखमी झाल्याने सुमारे पन्नास निदर्शकांना ताब्यात घेण्यात आले. (Thiruparankaundram Hill Controversy)
 
मिळालेल्या माहितीनुसार, हायकोर्टाच्या निर्णयानुसार हिंदू मक्कल काची, हिंदू तमिझर काची, हनुमान सेनाई आणि हिंदू मुन्नी या चार हिंदू संघटनांचे सदस्य थिरुपरनकुंड्रम टेकडीवर दीप लावण्यासाठी जात होत्या, परंतु पोलिसांनी त्यांना टेकडीवर (Thiruparankaundram Hill Controversy) जाण्यापासून रोखले. यामध्ये हिंदू संघटनांचे सदस्य आणि पोलिसांमध्ये जोरदार झटापट झाली. परंतु तरीही काही कार्यकर्ते वर पोहचले आणि त्यांनी दीप पेटवला. त्यानंतर हजारो श्रद्धाळूंनी प्रज्वलित करण्यात आलेल्या महादीपमचे मनोभावे दर्शन घेतले. (Thiruparankaundram Hill Controversy)
 
हेही वाचा : Gita Jayanti : गीता जयंतीलाच द्यायला लावल्या अल्लाह हू अकबरच्या घोषणा
 
नक्की प्रकरण काय?
 
मद्रास उच्च न्यायालयाच्या मदुराई खंडपीठात काही भक्तांनी थिरुपरनकुंड्रम टेकडीवर (Thiruparankaundram Hill Controversy) कार्तिगाई दीप प्रज्वलित करण्याची मागणी करण्यात आली होती. १ डिसेंबर २०२५ रोजी न्यायालयाने १० व्यक्तींना हा दीप प्रज्वलित करण्याची परवानगी दिली. तसेच टेकडीवर दर्गा असल्याने राज्य सरकारने यासंबंधी सीआयएसएफ सुरक्षा पुरवावी असे देखील सांगितले. न्यायालयाच्या निर्णयानुसार अनेक श्रद्धाळू हिंदू संघटनांसहीत कार्तिगै दीपमच्या दिवशी थिरुपरनकुंड्रम टेकडीवर कार्तिगाई दीप प्रज्वलित करण्यासाठी गेले असता राज्य सरकारच्या पोलिसांनी न्यायालयाचा निर्णय झुगारत त्यांना अडवले. कार्यकर्ते आक्रमक झाल्याने पोलिसांत आणि त्यांच्यात झटापट झाली. यात दोन पोलिस जखमी झाल्याने पन्नास निदर्शकांना ताब्यात घेण्यात घेण्यात आले. (Thiruparankaundram Hill Controversy)
 
 

चारूदत्त टिळेकर

बारामती येथील तुळजाराम चतुरचंद महाविद्यालयात वाणिज्य विषयामध्ये पदवीचे शिक्षण. पुण्यातील रानडे इन्स्टिट्यूट येथून संज्ञापण आणि वृत्तपत्रविद्येमध्ये पदव्युत्तर पदवी. अनेक राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धांमध्ये सहभाग. रानडे इन्स्टिट्यूट येथे 'पश्चिम महाराष्ट्रातील वक्तृत्व स्पर्धांची परंपरा, समस्या आणि परिणाम' या विषयात सखोल अहवाल सादर. सध्या मुंबई तरुण भारत येथे पत्रकार म्हणून कार्यरत.