Maharashtra Seva Sangh : महाराष्ट्र सेवा संघाच्यावतीने सामाजिक संस्था पुरस्कार प्रदान सोहळ्याचे आयोजन

04 Dec 2025 13:19:27
Maharashtra Seva Sangh
 
मुंबई : (Maharashtra Seva Sangh) सविता गद्रे यांच्या सौजन्याने देण्यात येणाऱ्या महाराष्ट्र सेवा संघ (Maharashtra Seva Sangh) सामाजिक संस्था पुरस्कार प्रदान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. रविवार दि. ७ डिसेंबर रोजी सायंकाळी ५.३० वाजता मुलुंड येथील महाराष्ट्र सेवा संघाच्या (Maharashtra Seva Sangh) सु.ल. गद्रे सभागृहामध्ये पार पडणार आहे. हे वर्ष या पुरस्काराचे २९ वे वर्ष असून, देवरुख शिक्षण प्रसारक मंडळाला हा पुरस्कार देण्यात येणार आहे. (Maharashtra Seva Sangh) या प्रसंगी संस्थेचे अध्यक्ष सदानंद भागवत या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. सदर कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ पत्रकार उदय निगुडकर उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वृंदा दाभोळकर करणार असून, प्रख्यात लेखक मकरंद जोशी सुसंवादकाची भूमिका बजावणार आहे. (Maharashtra Seva Sangh)
 
 
Powered By Sangraha 9.0