Kumbh Mela Nashik 2027 : झाडाला मिठी मारता, तसं बकरीला का मिठी मारत नाही?, राणेंचा सवाल

04 Dec 2025 19:22:14

RANE
 


मुंबई : (Kumbh Mela Nashik 2027) नाशिकमध्ये २०२७ ला होणाऱ्या सिंहस्थ कुंभेमळ्याच्या तयारीला वेग आला आहे. सिंहस्थ कुंभमेळ्याला येणाऱ्या साधू-महंतांच्या राहण्याची व्यवस्था करण्यासाठी नाशिकच्या तपोवन परिसरात तयार करण्यात येणाऱ्या साधूग्राममुळे मोठा वाद निर्माण झाला आहे. साधुग्राम उभारणीसाठी तपोवन परिसरात ११५० एकरावरील १८०० झाडे तोडण्याची तयारी महापालिकेने सुरू केली आहे. यासाठी ग्रीन मार्किंग सुरू करण्यात आलं आहे. वृक्षतोडी विरोधात नाशिककर, पर्यावरणप्रेमी रस्त्यावर उतरले आहेत. या संवेदनशील मुद्द्याने तात्काळ राजकीय वळण घेतले. या प्रकणात राजकीय नेत्यांनी आणि विरोधी पक्षाच्या नेत्यांनीही पर्यावरणप्रेमींच्या बाजूने आवाज उठवला. (Kumbh Mela Nashik 2027) उबाठा गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे, मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि कॉग्रेस नेते विजय वडेट्टीवार तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही या वृक्षतोडीच्या निर्णयावर नाराजी व्यक्त करत पर्यावरणाचे जतन करण्याचे आवाहन केले. विरोधकांनीही यावर आक्षेप घेतल्याने मंत्री नितेश राणे (Nitesh Rane) यांनी या वादात उडी घेत तपोवन वृक्षतोडीची चिंता करणारे पर्यावरणवादी बकरी ईदला गप्प का? असा प्रश्न मंत्री नितेश राणेंनी यांनी विचारला आहे.
 

मंत्री नितेश राणे यांची पोस्ट


(Nitesh Rane) मत्स्योद्योग व बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांनी एक्स पोस्ट मध्ये म्हटलं होतं, तपोवन मधल्या वृक्ष थोड ची चिंता करणारे पर्यावरणवादी कधीच.. ईद च्या वेळी बकरी कापण्याला विरोध करताना दिसत नाहीत.. तेव्हा गप्प का ? सर्व धर्म सम भाव ? या त्यांच्या पोस्ट नंतर वाद निर्माण झाल्यानंतर त्यांनी पत्रकार परिषद घेत स्पष्टीकरण दिलं.



झाडाप्रमाणे बकरीला का मिठी मारत नाही?
 

(Kumbh Mela Nashik 2027) मत्स्योद्योग व बंदरे विकास मंत्री नितेश राणे (Nitesh Rane) हे पत्रकार परिषदेत म्हणाले, यावेळी त्यांनी झाडाला मिठी मारतात, तसं बकरीला का मिठी मारत नाही? असा प्रश्न त्यांनी विचारला. "ईदमध्ये मोठ्या प्रमाणात बकरींची हत्या होते आणि रक्ताचे पाट वाहत असतात तेव्हा हे पर्यावरणवादी आवाज उठवताना दिसत नाहीत. व्हर्च्युअल बकरी ईद करा असं कधीच बोलताना दिसत नाहीत. मग एका धर्माला एक न्याय आणि दुसऱ्या धर्माला दुसरा कशाला असा प्रश्न मी विचारला आहे. झाडं जगली पाहिजेत हा पर्यावरणाच्या दृष्टीने योग्य मुद्दा आहे. पण जसं झाडाला मिठी मारतात, तसं बकरीला का मिठी मारत नाही? असा साधा प्रश्न मी विचारला आहे," असं मंत्री राणे म्हणाले.
 
बकरी हा प्राणी नाही का? सोसायटी आणि घरांमध्ये बकरी ईदच्या वेळी रक्त वाहताना दिसत असतं. तेव्हा हे पर्यावरणप्रेमी कुठे असतात? इतकाच माझा साधा प्रश्न आहे. कोण ऑक्सिजन देतं, देत नाही हा वेगळा मुद्दा आहे. विजय वडेट्टीवारांनी मूळ मुद्द्यावरुन लक्ष वळवू नये. ते विसरले असतील की काँग्रेस नेत्याआधी ते हिंदू आहेत. आपल्या धर्माच्याच मोठ्या कार्यक्रमाला, सणासुदीला असे प्रश्न विचारले जातात. मग इतर सणांच्या वेळी गप्प का? असा प्रश्न मी विचारला असेल तर त्यात चूक काय?", असंही मंत्री नितेश राणे (Nitesh Rane) म्हणाले.
 
पुढे बोलताना मंत्री नितेश राणे म्हणाले..., (Kumbh Mela Nashik 2027) "कुंभमेळा होत असल्याने वृक्षतोड केली जात आहे हा मुद्दा आहे. साधूग्रामसाठी जागा उपलब्ध करुन दिली जात आहे. कुंभमेळ्याचा मुद्दा असताना, इतर धर्मांच्या वेळी का विचारला जात नाही इतकाच प्रश्न आहे. झाडं तोडणं, न तोडणं वेगळा मुद्दा आहे. पण ज्या कारणासाठी झाड तोडलं जात आहे, ज्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून हिंदू धर्माला, सणांना सातत्याने टार्गेट केलं जात आहे त्याच्यावरच प्रश्न विचारत आहे. आपल्याकडे इतका मोठा कुंभमेळा होत असताना, त्याची इतकी मोठी तयारी सुरु आहे. काहींना त्याची एलर्जी झाली आहे, त्यामुळे त्याची बदनामी करणं एककलमी कार्यक्रम आहे".
 

कुंभमेळा हा भाजपाचा कार्यक्रम आहे का?
 
(Nitesh Rane) मत्स्योद्योग व बंदरे विकास मंत्री नितेश राणे म्हणाले, (Kumbh Mela Nashik 2027) "भाजपा आणि राष्ट्रवादीचा विषय नाही. कुंभमेळा हा भाजपाचा कार्यक्रम आहे का? असा प्रश्नही राणेंनी विचारला आहे. हिंदूंच्या सणावर अचानक प्रश्न निर्माण होत असेल, प्रेम निर्माण होत असेल, अचानक झाडांना मिठी मारण्याचा कार्यक्रम सुरु होत असेल तर मग इतर धर्माच्या वेळी विरोध का होत नाही हे विचारायला हवं. बकऱ्या का कापल्या जात आहेत? पर्यावरणाचीही हानी होतेच की. रक्ताचं पाणी वाहत जातं. तेव्हा कुठे लपलेले असतात,"


Powered By Sangraha 9.0