Jay Pawar Wedding : उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या पुत्राचं डेस्टिनेशन वेडिंग! पण लग्न होणार कोणत्या देशात?

04 Dec 2025 18:58:14
Jay Pawar Wedding
 
मुंबई : (Jay Pawar Wedding) राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि खासदार सुनेत्रा पवार यांचा मुलगा जय पवार यांच्या शाही डेस्टिनेशन वेडिंगच्या (Jay Pawar Wedding) सध्या सोशल मीडियावर भलत्याच चर्चा सुरू आहेत. जय पवार यांचा विवाह ऋतुजा पाटील यांच्यासोबत होत असून, हा विवाह सोहळा (Jay Pawar Wedding) ४, ५ आणि ७ डिसेंबर रोजी मोठ्या उत्साहात पार पडणार आहे. या लग्नाला केवळ ४०० पाहुणे उपस्थित राहणार असून अजित पवारांनी राष्ट्रवादीच्या केवळ दोनच नेत्यांना आमंत्रण दिले असल्याचे समजत आहे. (Jay Pawar Wedding)
 
हेही वाचा : सावधान! पुढील काही दिवस समुद्राला मोठी भरती येण्याची शक्यता, मुंबई पोलीस आणि पालिकेकडून समुद्र किनारी न जाण्याचे आवाहन
 
जय पवार आणि ऋतुजा पाटील यांचा विवाह बहरीनमध्ये मोठ्या थाटामाटात पार पडणार असून, या विवाह सोहळ्यासाठी पवार-पाटील कुटुंबीयांकडून जय्यत तयारी करण्यात आली आहे. विवाह सोहळ्याचे (Jay Pawar Wedding) संपूर्ण कार्यक्रम चार दिवसांचे असून, यात पारंपरिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. ४ डिसेंबरला मेहेंद समारंभ, ५ डिसेंबरला संगीत, तर ६ डिसेंबरला हळदी, वरात आणि मुख्य लग्नसोहळा (Jay Pawar Wedding) होणार आहे, तर ७ डिसेंबरला स्वागत समारंभ पार पडणार असल्याच माध्यमांवरून समजत आहे. (Jay Pawar Wedding)
 
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील केवळ दोनच नेत्यांना या सोहळ्याचे (Jay Pawar Wedding) निमंत्रण देण्यात आले आहे. या निवडक नेत्यांमध्ये सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांनाच निमंत्रण गेल्याचे समजत आहे. (Jay Pawar Wedding)
 
 
Powered By Sangraha 9.0