IndiGo Flight Cancellations Updates : इंडिगो संकटात! एका दिवसात तब्बल १०० हून अधिक उड्डाणे रद्द, अनेक प्रमुख विमानतळांवर प्रवाश्यांची गर्दी

04 Dec 2025 14:00:10
 
IndiGo Flight Cancellations Updates
 
मुंबई : (IndiGo Flight Cancellations Updates) भारतीय विमान कंपनी इंडिगो गेल्या काही वर्षांपासून सातत्याने मंदीचा सामना करत आहे. त्यातच आता आणखी भर पडलेय. गेल्या काही दिवसांपासून इंडिगोची अनेक उड्डाने रद्द झाली आहेत. आज गुरूवार दि. ४ डिसेंबर रोजी एकाच दिवशी तब्बल १०० हून अधिक उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत. यामुळे प्रवाश्यांची चांगलीच गैरसोय झाली आहे. अनेक प्रमुख विमानतळांवर प्रवाश्यांची गर्दी पाहायला मिळत आहे. (IndiGo Flight Cancellations Updates)
 
हेही वाचा :  Maharashtra Seva Sangh : महाराष्ट्र सेवा संघाच्यावतीने सामाजिक संस्था पुरस्कार प्रदान सोहळ्याचे आयोजन
 
दरम्यान माध्यमांवरून मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या ४८ तासांत इंडिगोची जवळपास ३०० उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत. या संदर्भात नागरी विमान वाहतूक महासंचालनालयसोबत (डीजीसीए) झालेल्या बैठकीत इंडिगोने ही उड्डाने रद्द का झाली यामागची कारणे दिली आहेत. तांत्रिक बिघाड आणि क्रू मेंबर्सची कमतरता यामुळे ही परिस्थिती निर्माण झाली असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. त्यासोबतच, त्यांनी प्रवाश्यांची जाहीर माफी देखील मागितली आहे. (IndiGo Flight Cancellations Updates)
 
आतापर्यंत रद्द झालेली उड्डाणे (IndiGo Flight Cancellations Updates)
 
बेंगळुरू - ४२
दिल्ली - ३८
अहमदाबाद -२५
इंदूर - ११
हैदराबाद - १९
सुरत - ०८
कोलकाता - १०
 
 
Powered By Sangraha 9.0