सावधान! पुढील काही दिवस समुद्राला मोठी भरती येण्याची शक्यता, मुंबई पोलीस आणि पालिकेकडून समुद्र किनारी न जाण्याचे आवाहन

04 Dec 2025 18:23:57
High Tide Alert in Mumbai
 
मुंबई : ( High Tide Alert in Mumbai ) डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिना निमित्त ६ डिसेंबरला महाराष्ट्राभरातून मोठया संख्येने अनुयायी मुंबईतील चैत्यभूमी आणि शिवाजी पार्क मैदानावर दाखल होतात. याच पार्श्वभूमीवर, ४ ते ७ डिसेंबरपर्यंत मुंबई महानगरपालिकेने समुद्रातील भरतीचे वेळापत्रक जाहीर केले आहे. या वेळी समुद्राला मोठी भरती येणार असून, ४ डिसेंबरच्या मध्यरात्री १२ वाजता ५ मीटर उंचीच्या लाटा उसळण्याची शक्यता वर्तवली आहे.
 
दरम्यान, महापरिनिर्वाण दिना निमित्त येणाऱ्या सर्व अनुयायींना आणि मुंबईकरांना मुंबई महानगरपालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाने विशेष खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे.
 
समुद्रकिनाऱ्यांवर जाणे किंवा समुद्रात उतरणे टाळावे, तसेच विनाकारण किनारी फिरू नये, अशा सूचना त्यांनी दिल्या आहेत. ५, ६ आणि ७ डिसेंबर रोजी वेगवेगळ्या वेळी सकाळी, दुपारी आणि संध्याकाळी भरती येण्याची शक्यता आहे. त्यामुळे सर्वांनी सावधगिरी बाळगावी, असे आवाहन मुंबई पोलीस आणि पालिकेकडून करण्यात आले आहे.
 
Powered By Sangraha 9.0