मुंबई : (Growing Islamization in Japan) जपानमध्ये मुस्लिम लोकसंख्येची (Growing Islamization in Japan) झपाट्याने वाढ होत असून, त्यामुळे संपूर्ण जगाचे लक्ष आता त्या दिशेने वेधले जात आहे. येथे मोठमोठ्या मशिदी उभारल्या गेल्या आहेत. इतकेच नव्हे तर काही विद्यापीठांमध्येही मशिदी दिसू लागल्या आहेत. जपानचे ४७ प्रांत मिळून २.३ लाख ते ४.२ लाख लोकसंख्या इस्लाम मानणाऱ्यांची आहे. अलीकडेच दफनभूमीसाठी जागा देण्याबाबत संसदेत प्रश्न उपस्थित झाल्यानंतर हा मुद्दा पुन्हा चर्चेत आला. (Growing Islamization in Japan)
२०१६ च्या आकडेवारीनुसार जपानमध्ये सुमारे १.३० लाख मुस्लिम होते. त्यातील १.२० लाख विदेशी मुस्लिम आणि १० हजार जपानी मुस्लिम होते. पण आता या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. स्थानिक माध्यमांच्या अहवालानुसार, ४७ प्रांतांमध्ये एकूण २.३ ते ४.२ लाख मुस्लिम राहत असून ही संख्या वर्षानुवर्षे वाढत आहे. हे लोक बहुतेक मजूर, टेक्नॉलॉजी, बिझनेस आणि शिक्षण क्षेत्रात काम करणारे प्रवासी आहेत. वासेदा विद्यापीठातील प्रा. हिरोफुमी तनाडा यांच्या संशोधनानुसार जपानमधील मुस्लिम (Growing Islamization in Japan) संख्या २ लाखांपेक्षा जास्त आहे. मार्च २०२१ पर्यंत देशभरातील मशिदींची संख्या १९९९ मधील १५ वरून ११३ वर पोहोचली आहे. (Growing Islamization in Japan)
इराण, पाकिस्तानसारख्या देशांमधून वाढलेल्या इमिग्रेशनमुळे आणि धर्मांतरामुळे जून २०२४ पर्यंत जपानमध्ये एकूण १४९ मशिदी उभारल्या गेल्या आहेत, म्हणजेच त्यांची संख्या १० पट वाढली. (Growing Islamization in Japan) अनेक मशिदींचे मोठ्या इमारतींमध्ये रूपांतर झाले आहे. टोक्योतील टोक्यो कॅमी मशीद अलीकडेच बहुमजली करण्यात आली. तसेच येथे वेळोवेळी इस्लामिक कार्यक्रम आयोजित करून लोकांना आकर्षित केले जाते. काही विद्यापीठांमध्येही मशिदी बनल्या आहेत. वासेदा विद्यापीठाच्या टोकोरोजावा कॅम्पसजवळील एका इमारतीचे मशीदमध्ये रूपांतर करण्यात आले आहे. इस्लामचा प्रसार करण्यासाठी अनेक परदेशी लोक जपानमध्ये आले आणि कार्यक्रम आयोजित करत जपानी लोकांना आकर्षित केले. अनेकांचे धर्मांतर यातून घडले. आता परिस्थिती अशी आहे की जपानमध्ये प्रवासी मुस्लिमांसह जपानी मुस्लिमांच्याही पिढ्या तयार होत आहेत. (Growing Islamization in Japan)
अलीकडे बातमी आली की जपान सरकारने नवीन दफनभूमीसाठी जमीन देण्यास नकार दिला असून, प्रवासी मुस्लिमांना मृतदेह त्यांच्या देशात नेऊन दफन करण्यास सांगितले आहे. हाऊस ऑफ कौन्सिलर्सच्या सदस्य उमेमुरा मिजुहो यांनी सांगितले की जपानमधील जमीन कमी आहे, आणि येथे नैसर्गिक आपत्ती वारंवार येतात. मोठ्या आपत्तीमध्ये दफन केलेले मृतदेह बाहेर पडण्याची शक्यता असते. शिवाय, जपानमधील ९९% लोक अंत्यसंस्कार करतात, त्यामुळे दफनासंबंधी नियम कडक असावेत. सरकारने स्थानिक प्रशासनाला परंपरा, पर्यावरण आणि नियमांचा विचार करून निर्णय घेण्यास सांगितले आहे. (Growing Islamization in Japan)
'मास मीडिया' या विषयातून पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण.'कम्युनिकेशन ॲण्ड जर्नालिझम' विषयातून पदव्युत्तरपर्यंतचे शिक्षण पूर्ण. सध्या दै.'मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक म्हणून कार्यरत. लिखाण, संगीत, वाचन, फोटोग्राफी, इ.ची आवड.लिवोग्राफी भाषाशैलीत विशेष प्रावीण्य.बालपणापासून रा.स्व.संघाचा स्वयंसेवक