Dr. Babasaheb Ambedkar Tour Circuit : डॉ. बाबासाहेब आंबेडकर टूर सर्किट मुंबईत सुरू

    04-Dec-2025
Total Views |
Dr. Babasaheb Ambedkar Tour Circuit 
 
मुंबई : (Dr. Babasaheb Ambedkar Tour Circuit) महापरिनिर्वाण दिनानिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर टूर सर्किटचा (Dr. Babasaheb Ambedkar Tour Circuit) पहिला दिवस मुंबईतील दादर शिवाजी पार्क येथे सुरू झाला आहे. या टूरमध्ये (Dr. Babasaheb Ambedkar Tour Circuit) पर्यटन विभागाचे उपसचिव संतोष रोकडे, भा.प्र.से. अधिकारी सिद्धार्थ रामकुमार, पर्यटन संचालनालयाचे सहाय्यक संचालक सुशील पवार आणि अन्य मान्यवर उपस्थित होते. टूरमध्ये चैत्यभूमी, राजगृह, डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालय वडाळा, डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन, बीआयटी चाळ परळ आणि सिद्धार्थ महाविद्यालय फोर्ट अशा स्थळांना भेट देण्यात आली. टूरद्वारे नागरिकांना व पर्यटकांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवन प्रवासाची माहिती तसेच समाजसमता, शिक्षण आणि भारतीय संविधान निर्मितीतील कार्याची माहिती देणे उद्दिष्ट आहे. हा टूर सर्किट ४ व ५ डिसेंबर २०२५ रोजीही आयोजित केला जाणार आहे. नागरिकांना व पर्यटकांना याचा लाभ घेण्याचे पर्यटन विभागाने आवाहन केले आहे.(Dr. Babasaheb Ambedkar Tour Circuit)
 
अधिक माहितीसाठी संपर्क:
सूरज चतुर्वेदी – ९८१०८१७५५३०
पवन पवार – ७६६६६०३२११
पर्यटन संचालनालय चॅटबॉट – ९९९३०८८८३ प्रसिद्ध करण्यात आले आहेत.