मुंबई : (Digital Satbara) जमिनीच्या नोंदींसाठी ७/१२ उतारा मिळवण्यासाठी आता तलाठी सज्जाचे उंबरे झिजवण्याची गरज नाही. राज्य महसूल विभागाने डिजिटल सातबारा (Digital Satbara) उताऱ्याला अधिकृत कायदेशीर मान्यता दिली असून, आता हा उतारा नागरिकांना घरबसल्या ऑनलाइन उपलब्ध होणार आहे.
महसूल प्रशासनातील जुनी, विलंब देणारी आणि किचकट प्रक्रिया यामुळे नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत होता. मात्र, या निर्णयामुळे ही सर्व प्रक्रिया आता इतिहासजमा झाली आहे. केवळ १५ रुपयांमध्ये अधिकृत ७/१२ उतारा ऑनलाइन मिळणार आहे. (Digital Satbara)
हेही वाचा : वायु प्रदूषण नियंत्रण नियमावलीचे उल्लंघन करणाऱ्या उद्योगांवर धडक कारवाई केली जाणार : एमपीसीबी अध्यक्ष सिध्देश कदम
विशेष म्हणजे, या डिजिटल (Digital Satbara) उताऱ्यावर तलाठ्याच्या सही किंवा स्टॅम्पची आवश्यकता राहणार नाही. डिजिटल स्वाक्षरी, QR कोड आणि १६ अंकी पडताळणी क्रमांक यांसह मिळणारे ७/१२, ८-अ आणि फेरफार उतारे आता सर्व सरकारी, निमसरकारी, बँकिंग आणि न्यायालयीन कामकाजासाठी पूर्णपणे वैध राहणार आहेत, अशी माहिती महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली. (Digital Satbara)
हे वाचलात का ? : Maharashtra Pollution Control Board : भविष्यात पर्यावरण क्षेत्रात पुनर्चक्रीत अर्थव्यवस्था महत्वपूर्ण भूमिका बजावेल.. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सदस्य सचिव एम देवेंदर सिंह यांचे प्रतिपादन ...
नागरिकांना हे उतारे digitalsatbara.mahabhumi.gov.in या महाभूमी पोर्टलवर डिजिटल पेमेंटद्वारे सहज डाउनलोड करता येणार आहेत. (Digital Satbara)
महसूल विभागातील ही ‘डिजिटल क्रांती’ (Digital Satbara) सेवा डिजिटल महाराष्ट्रच्या दिशेने मोठे पाऊल मानली जात आहे. (Digital Satbara)