नवी दिल्ली : (Faridabad Crime) दिल्लीजवळील फरीदाबादमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. व्हॅनमध्ये लिफ्ट देऊन एका महिलेवर सामूहिक बलात्कार झाल्याची घटना सोमवारी रात्री घडली. महिलेवर धावत्या व्हॅनमध्ये दोन ते तीन तास अत्याचार केल्यानंतर नराधमांनी तिला मध्यरात्री तीन वाजता धावत्या व्हॅनमधून ढकलून दिले. या घटनेत महिला गंभीर जखमी झाली असून उपचारादरम्यान तिच्या चेहऱ्यावर बारा टाके घालावे लागले आहेत.(Faridabad Crime)
धावत्या व्हॅनमध्ये अत्याचार
फरीदाबाद येथील २८ वर्षीय विवाहित महिला सोमवारी रात्री घरी जाण्यासाठी वाहनाची वाट पाहत थांबली होती. त्यावेळी एका व्हॅनमधून आलेल्या दोघांनी लिफ्ट विचारली आणि घरी सोडतो, असे सांगितले. उशीर होत असल्याने आणि कोणतेही वाहन मिळत नसल्याने महिला व्हॅनमध्ये बसली. परंतु, त्यानंतर ती व्हॅन दुसऱ्याच रस्त्याने नेण्यात आली. व्हॅनमधील दोघांनी आळीपाळीने तिच्यावर बलात्कार केला.(Faridabad Crime)
दोन ते तीन तास व्हॅनमध्ये तिच्यावर अत्याचार करण्यात आले. त्यावेळी महिला मदतीसाठी ओरडत होती, पण कडाक्याच्या थंडी आणि धुक्यात रस्त्यावर मोजकेच लोक असल्याने कोणीही तिचा आवाज ऐकला नाही. कोणाचेही व्हॅनकडे लक्ष गेले नाही. मध्यरात्री तीनच्या सुमारास नराधमांनी महिलेला धावत्या व्हॅनमधून राजा चौक येथे रस्त्यावर फेकले. महिलेच्या चेहऱ्याला गंभीर इजा झाली. तसेच तिचा रक्तस्राव मोठ्या प्रमाणात होत होता. तिच्या चेहऱ्यावर बारा टाके देण्यात आले आहेत.(Faridabad Crime)
नराधमांनी धावत्या व्हॅनमधून ढकलून दिल्यानंतर महिलेने तिच्या घरच्यांना फोन करून झालेल्या घटनेची माहिती दिली. तिच्यावर सध्या रूग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेनंतर महिलेला मानसिक धक्का बसला आहे. तसेच आतापर्यंत तिचा जबाब नोंदवण्यात आलेला नाही. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून मंगळवारी दोन्ही आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे.(Faridabad Crime)