ठाणे : (Thane Municipal Corporation General Election) ठाणे महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५-२६ (Thane Municipal Corporation General Election) पंधरा दिवसांवर येवून ठेपली असून त्या दृष्टीने ठाणे शहरातील मतदान केंद्रांच्या भौतिक सुविधांचे सखोल नियोजन पूर्ण झाले असून, निवडणूक प्रशासनाने मतदान केंद्रनिहाय मजल्यानुसार कक्षांची सविस्तर माहिती जाहीर केली आहे. या माहितीनुसार शहरातील ३३ मतदान केंद्रांमध्ये एकूण २०१३ मतदान कक्ष कार्यान्वित करण्याची तयारी सुरू असल्याचे आयुक्त तथा निवडणूक (Thane Municipal Corporation General Election) अधिकारी सौरभ राव यांनी नमूद केले.(Thane Municipal Corporation General Election)
ठाणे महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीसाठी (Thane Municipal Corporation General Election) प्रभागसमितीनिहाय मतदान केंद्राची व्यवस्था करण्यात येत असून माजिवडा मानपाडा प्रभाग समितीमध्ये २६६, वर्तकनगर प्रभाग समिती अंतर्गत १८७, लोकमान्यनगर-सावरकरनगर प्रभागसमितीमध्ये २४२, कळवा प्रभाग समितीअंतर्गत २६३, उथळसर प्रभाग समितीमध्ये १५८, वागळे प्रभाग समितीमध्ये १६०, नौपाडा कोपरी प्रभागसमितीमध्ये २१४, मुंब्रा प्रभाग समितीमध्ये २६९आणि दिवा प्रभाग समितीमध्ये २५५ मतदान केंद्र असणार आहेत.(Thane Municipal Corporation General Election)
मतदारांना सुलभ, सुरक्षित व पारदर्शक मतदान करता यावे यासाठी केंद्रांची रचना काटेकोरपणे करण्यात आली आहे. यामध्ये तळमजल्यावर १२०७ कक्ष, पार्टीशन स्वरूपातील ३६१ कक्ष, मंडपामध्ये ४०३ कक्ष, तर पहिल्या मजल्यावर ४२ कक्ष उपलब्ध असणार आहेत.(Thane Municipal Corporation General Election)
हेही वाचा : Ulhasnagar Municipal Corporation : निवडणूक विशेष - महानगरपालिकेचा रणसंग्राम
प्रत्येक मतदान केंद्रावर प्रवेश व निर्गमनासाठी स्वतंत्र व्यवस्था, मतदान अधिकारी व पोलीस बंदोबस्त, सीसीटीव्ही यंत्रणा तसेच ईव्हीएम व बॅलेट युनिट यंत्रांची सुरक्षित मांडणी करण्याच्या सूचना प्रशिक्षण वर्गात मतदन केंद्राध्यक्षांना देण्यात आल्या आहेत. मतदारांची गर्दी नियंत्रित ठेवून मतदान प्रक्रिया वेळेत पार पडावी, यासाठी कक्षांची संख्या व मांडणी नियोजनपूर्वक करण्यात येणार आहेत.(Thane Municipal Corporation General Election)
ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग, गर्भवती महिला तसेच आजारी मतदारांना मतदान करताना कोणतीही अडचण येऊ नये, यासाठी तळमजल्यावर अधिकाधिक कक्ष ठेवण्यात आले आहेत. आवश्यक त्या ठिकाणी रॅम्प, रेलिंग, व्हीलचेअर, पिण्याचे पाणी, सावलीची व्यवस्था तसेच प्राथमिक वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देण्याच्या सूचनाही संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आल्या असल्याचे आयुक्तांनी सांगितले.(Thane Municipal Corporation General Election)
निवडणूक (Thane Municipal Corporation General Election) कामकाजासाठी नेमण्यात आलेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना मतदान केंद्रांच्या रचनेबाबत आवश्यक प्रशिक्षण देण्यात आले असून, मतदानाच्या दिवशी कोणताही गोंधळ होऊ नये यासाठी मॉक ड्रिल व पूर्वतयारी तपासणी केली जाणार आहे.(Thane Municipal Corporation General Election)