पनवेल : (Palika Election 2026) मतदान होण्याआधीच भाजपच्या खात्यात चौथा विजय जमा झाला असून, पनवेल महानगरपालिकेत भाजपने खाते उघडले आहे. प्रभाग क्रमांक १८ मधून भाजपचे उमेदवार नितीन पाटील हे बिनविरोध विजयी झाले आहेत. शेतकरी कामगार पक्ष–महाविकास आघाडीचे उमेदवार रोहन गावंड यांचा अर्ज छाननीदरम्यान बाद झाल्याने नितीन पाटील यांचा विजय निश्चित झाला. (Palika Election 2026)
हेही वाचा : Thane Municipal Corporation General Election : ठाणे महापालिका सार्वत्रिक निवडणुकीसाठी काटेकोर नियोजन
नितीन पाटील हे याआधीही पनवेल महानगरपालिकेत (Palika Election 2026) भाजपचे स्वीकृत नगरसेवक होते. त्यांच्या बिनविरोध निवडीमुळे भाजप कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह संचारला असून, ठिकठिकाणी गुलाल उधळून विजयाचा जल्लोष करण्यात आला. या बिनविरोध विजयामुळे पनवेलमधील राजकीय वातावरणात भाजपची ताकद वाढली असून, आगामी महापालिका निवडणुकांसाठी पक्षाचा आत्मविश्वास अधिक बळावला आहे. (Palika Election 2026)