Municipal Elections :२९ महापालिकांच्या निवडणुकीत भाजपची आघाडी, सहा उमेदवार बिनविरोध विजयी

31 Dec 2025 17:26:07
 Municipal Elections
 
मुंबई : (Municipal Elections) राज्यात २९ महापालिकांच्या निवडणुका होत असताना भाजपने सुरुवातीलाच जोरदार आघाडी घेतली आहे. अर्ज छाननी प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर भाजपचे सहा उमेदवार बिनविरोध विजयी झाले असून, विशेष म्हणजे यापैकी कल्याण-डोंबिवली, पनवेल आणि धुळे या तीन महापालिकांमध्ये भाजपचे ‘कमळ’ आधीच फुलले आहे. (Municipal Elections)
 
हेही वाचा :  Palika Election 2026 : मतदानाआधीच भाजपच्या खात्यात चौथा विजय! पनवेलमध्ये गुलालाची उधळण, नेमकं प्रकरण काय?
 
कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेत (Municipal Elections) भाजपच्या तीन उमेदवारांनी बिनविरोध विजय मिळवला आहे. यामध्ये रेखा चौधरी, आसावरी नवरे आणि रंजना पेनकर यांचा समावेश आहे. मुंबई महानगरपालिकेतून भाजपच्या जिग्ना शहा या उमेदवार बिनविरोध निवडून आल्या आहेत. धुळे महानगरपालिकेत उज्वला भोसले यांनी, तर पनवेल महानगरपालिकेत १८ प्रभाग क्रमांकातून नितीन पाटील यांनी बिनविरोध विजय मिळवला आहे. (Municipal Elections)
 
हे वाचलात का ?: Thackeray Brothers : नागपूर पालिका निवडणूकीत ठाकरे बंधूंच्या युतीला ब्रेक!
 
या बिनविरोध विजयांमुळे भाजपने निवडणुकीपूर्वीच आपली ताकद दाखवून दिली असून, महापालिका निवडणुकांमध्ये पक्षाचा आत्मविश्वास वाढला आहे. महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपसाठी हा सकारात्मक संकेत मानला जात असून, आगामी मतदानातही पक्षाला याचा फायदा होईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे. (Municipal Elections)
 
 
Powered By Sangraha 9.0