मुंबई : (Mamata Banerjee) पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांनी सिलिगुडीमध्ये महाकाल मंदिर बांधण्याची घोषणा केली. याशिवाय त्यांनी गंगासागर पुलाचे काम करण्याचे देखील आश्वासन दिले. परंतु हा ममता बॅनर्जींच्या (Mamata Banerjee) श्रद्धेचा विषय नसून, २०२६ च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी हिंदू मतांसाठी केलेले नियोजन आहे.
पश्चिम बंगालच्या राजकारणात एकेकाळी जय श्री राम या घोषणेमुळे चिडलेल्या ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) आता स्वतः हिंदू मंदिरांचा आश्रय घेत आहेत. त्यांनी (Mamata Banerjee) घोषणा केली आहे की, त्या ५ जानेवारी रोजी त्या गंगासागर येथे पुलाच्या बांधकामाची पायाभरणी करतील. त्याचबरोबर जानेवारीच्या दुसऱ्या आठवड्यात सिलीगुडी येथील महाकाल मंदिराची पायाभरणी करतील. याशिवाय सध्या दिघा येथे जगन्नाथ मंदिराचे बांधकाम सुरू आहे.(Mamata Banerjee)
हेही वाचा : Sadanand Date : राज्याच्या पोलिस महासंचालकपदी सदानंद दाते यांची नियुक्ती; ३ जानेवारी रोजी पदभार स्विकारणार
सिलिगुडी हे उत्तर बंगालचे प्रवेशद्वार आहे. गेल्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत भाजपने तृणमूल काँग्रेसला याच भागातून पराभूत केले होते. उत्तर बंगालमध्ये भाजपची पकड खूप मजबूत आहे आणि हे मुख्यत्वे आदिवासी आणि गोरखा समुदायांचे एकत्रीकरण तसेच हिंदू मतपेढीमुळे आहे.(Mamata Banerjee)
धर्मनिरपेक्ष ही विचारसरणी
अनेक लोक म्हणत आहेत की, ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) तुष्टीकरण करत आहे, पण मी धर्मनिरपेक्ष आहे. सर्व धर्मांवर विश्वास ठेवते. आमच्या पक्षाला सर्व जाती, सर्व धर्म आवडतात. हीच आमची विचारसरणी आहे. प्रत्येक व्यक्तीचा स्वतःचा लोकशाही अधिकार आहे. मी केंद्र सरकारला गंगासागर पूल बांधण्यासाठी भाग पाडण्याचा प्रयत्न करत होते, पण आता मी तो स्वतः बांधून पूर्ण करून घेईल. मी ५ जानेवारी रोजी या पुलाची पायाभरणी करून पुढील दोन वर्षांत हा पूल जनतेसाठी तयार करेल.(Mamata Banerjee)