JNPT-Vaitarna : जेएनपीटी-वैतरणा डीएफसी मार्गावर ऐतिहासिक धाव

31 Dec 2025 18:39:17
JNPT-Vaitarna
 
मुंबई : (JNPT-Vaitarna) भारताच्या मालवाहतूक क्षमतेला नवे पंख देणाऱ्या पश्चिम डेडिकेटेड फ्रेट कॉरिडोरवर एक महत्त्वाचा टप्पा गाठण्यात आला आहे. डेडिकेटेड फ्रेट कॉरिडोर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड (डीएफसीसीआयएल) चे व्यवस्थापकीय संचालक प्रविण कुमार यांनी जेएनपीटी ते वैतरणा दरम्यान सुमारे १०२ किलोमीटर अंतराची पहिली रेल कार तपासणी यशस्वीरीत्या पूर्ण केली.(JNPT-Vaitarna)
 
जेएनपीटी–वैतरणा (JNPT-Vaitarna) या नव्याने विकसित डीएफसीसीआयएल ट्रॅकवर प्रथमच रेल्वे वाहतूक प्रत्यक्ष धावली, आणि त्यामुळे हा क्षण भारतीय रेल्वे मालवाहतुकीच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी नोंदवला गेला. हा महत्त्वाचा विभाग पश्चिम डेडिकेटेड फ्रेट कॉरिडोरचा प्रारंभिक टप्पा असून डीएफसीसीआयएलच्या सीजीएम/मुंबई युनिटच्या कार्यक्षेत्रात येतो.(JNPT-Vaitarna)
 
ही यशस्वी रेल कार तपासणी म्हणजे जेएनपीटी–वैतरणा (JNPT-Vaitarna) डीएफसी मार्ग लवकरच कार्यान्वित होण्याचा स्पष्ट संकेत आहे. मार्ग सुरू झाल्यानंतर, देशातील अंतर्गत औद्योगिक क्षेत्रे आणि जेएनपीटी बंदर यांच्यातील मालवाहतूक अधिक वेगवान, सुलभ आणि कार्यक्षम होणार आहे. तसेच जागतिक दर्जाची लॉजिस्टिक पायाभूत रचना उभारण्याच्या डीएफसीसीआयएलच्या दृष्टीकोनाला ही मोठी चालना ठरणार आहे.(JNPT-Vaitarna)
 
हेही वाचा : Jaigad Port : जयगड बंदरातून काजू निर्यात होणार
 
या १०२ किमी मार्गापैकी वैतरणा (JNPT-Vaitarna) ते न्यू खरबाओ दरम्यानचा ३० किमीचा विभाग पूर्णतः विद्युतीकृत झाला असून, दि.३० नोव्हेंबर २०२५ रोजी विद्युतीकृत लोकोमोटिव्हची यशस्वी चाचणी घेण्यात आली होती. उर्वरित मार्गावर विद्युतीकरण व अत्याधुनिक सिग्नलिंगची कामे अंतिम टप्प्यात असून ती लवकरच पूर्ण होणार आहेत.(JNPT-Vaitarna)
 
या ऐतिहासिक तपासणीवेळी डीएफसीसीआयएलचे संचालक (अवसंरचना) अनुराग शर्मा,कार्यकारी संचालक (प्रकल्प) संदेश श्रीवास्तव, मुख्य महाव्यवस्थापक (मुंबई) विकास कुमार, तसेच मुंबई युनिटचे वरिष्ठ अधिकारी, अंमलबजावणी संस्थांचे प्रतिनिधी (मेसर्स टाटा प्रोजेक्ट्स, मेसर्स एल अँड टी, मेसर्स केपीआयएल) आणि इतर सल्लागार उपस्थित होते. जेएनपीटी–वैतरणा (JNPT-Vaitarna) डीएफसी मार्ग हा भारताच्या मालवाहतूक व्यवस्थेला नव्या युगात घेऊन जाणारा मैलाचा दगड ठरणार असून, ‘वेगवान भारत - सक्षम लॉजिस्टिक्स’ या राष्ट्रीय उद्दिष्टाकडे नेणारी ही एक ठाम पावले आहेत.(JNPT-Vaitarna)
 
 
Powered By Sangraha 9.0