Mumbai Municipal Corporation Election : 'त्या' अडीच वर्षांनंतर मुंबईतील मराठी माणसासाठी काय बदलले?

30 Dec 2025 20:06:14
Mumbai Municipal Corporation Election

मुंबई : (Mumbai Municipal Corporation Election) 'नाव मोठे लक्षण खोटे' अशी मराठीतील प्रचलित म्हण आहे. जवळपास २५ वर्षे मुंबई महानगरपालिकेवर सत्ता असताना मराठी माणसाकडे ढुंकूणही न पाहणाऱ्या ठाकरे बंधूंनी आता निवडणूकीच्या (Mumbai Municipal Corporation Election) तोंडावर युती केली आहे. 'मराठी माणूस' या एका शब्दावर सध्या ते निवडणूकीच्या (Mumbai Municipal Corporation Election) रिंगणात उतरलेत. मात्र, उद्धव ठाकरे सत्तेत असताना त्यांनी मुंबईतील मराठी माणसासाठी काय केले? हा प्रश्न अजूनही अनुत्तरीत आहे. याशिवाय आता तर मराठी माणसासाठी आम्ही एकत्र आलो म्हणणाऱ्या ठाकरे बंधूंनी अमराठी उमेदवारांनाही पक्षातर्फे संधी दिली आहे.(Mumbai Municipal Corporation Election)
 
मुंबई आणि मराठी माणसाची ओळख, भाषा, संस्कृती आणि रोजगार यावर राजकीय सरकारांची भूमिका नेहमीच चर्चेचा विषय राहिली आहे. उद्धव ठाकरे आणि त्यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेने मुंबई महापालिकेत सत्ता उपभोगली, पण मराठी माणसाच्या रोजगाराचा प्रश्न सुटला नाही, मुंबईतून मराठी माणूस हद्दपार होत गेला आणि मुंबईत स्वत:च्या घरासाठीचा संघर्ष अधिकच तीव्र झाला. इतकी वर्षे सत्ता होती, संधी होती, पण इच्छाशक्ती नव्हती, असे म्हणावे लागेल. या काळात अस्मितेची भाषा वापरली गेली, मात्र, मराठी माणसाला स्थैर्य देणारे धोरण, नोकरीत प्राधान्य देणारे निर्णय आणि मुंबईत टिकवून ठेवणारी घरे असे अनेक प्रश्न वाढले.(Mumbai Municipal Corporation Election)
 
याउलट जून २०२२ ते डिसेंबर २०२४ आणि त्यानंतर आतापर्यंतच्या महायुती सरकारच्या काळात अनेक महत्त्वाचे निर्णय, उपक्रम आणि धोरणात्मक बदल दिसून आले आहेत. हे बदल प्रत्यक्षात मराठी भाषेचा सन्मान, संस्कृतीचा प्रचार आणि मराठी माणसाच्या ओळखीला धोरणात्मक प्राधान्य देण्याच्या दिशेने आहेत. राज्याने २०२४-२५ या आर्थिक वर्षात गेल्या १० वर्षांतील सर्वाधिक वार्षिक परकीय गुंतवणूक ही अवघ्या ९ महिन्यात प्राप्त केली. यामुळे मराठी माणसाला रोजगार तर मिळालाच, पण मुंबईतून उद्योग बाहेर जात असल्याचा आरोप करणाऱ्यांना जोरदार चपराकही बसली.(Mumbai Municipal Corporation Election)
 
हेही वाचा : BMC Election : घाटकोपरमध्ये भाजप उमेदवारांचे जोरदार शक्तिप्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल 
 
गृहनिर्माण प्रकल्पांना गती
 
महायुती सरकारने बीडीडी चाळीचा पुनर्विकास करून १५० चौरस फुटाच्या घरात राहणाऱ्या मराठी माणसाला तिथेच ५०० चौरस फूटांचे घर मिळवून दिले. मुंबईत राबवलेल्या वेगवेगळ्या गृहनिर्माण आणि पुनर्विकासाच्या धोरणांमुळे मराठी माणूस मुंबईत स्थिरावला. याव्यतिरिक्त मुंबई मेट्रो, अटल सेतू, कोस्टल रोड यासह विविध पायाभूत प्रकल्पांमुळे सामान्य मुंबईकरांच्या जीवनात आमुलाग्र बदल झाला.(Mumbai Municipal Corporation Election)
 
मराठी भाषेला प्रतिष्ठा
 
मराठी भाषा संवर्धनासाठी केंद्र सरकारने मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिला. त्यासाठी केंद्राकडे वारंवार पाठपुरावा करणे आणि आवश्यक ती कागपत्रे सादर करणे, हे महायुती सरकारचे मराठी भाषा आणि मराठी माणसासाठी केलेले सर्वात महत्वाचे काम आहे. याशिवाय सर्व शासकीय कार्यालयांमध्ये मराठीचा वापर अनिवार्य करणे, लंडनमध्ये छत्रपती शिवाजी महाराज वैश्विक मराठी भाषा केंद्र स्थापन करणे हे मराठी भाषा जागतिक स्तरावर पोहोचवण्याच्या दृष्टीने उचललेले महत्वाचे पाऊल म्हणावे लागेल.(Mumbai Municipal Corporation Election)
 
थोडक्यात काय तर, आता निवडणूकांच्या (Mumbai Municipal Corporation Election) निमित्ताने ठाकरे बंधूंची मराठी अस्मिता पुन्हा जागी झाली असून त्यांनी भावनिक वातावरण तयार करून मते मिळवण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. मात्र, मुंबईत महायुती सरकारने विणलेले विकासकामांचे जाळे आणि मराठीचा सन्मान यामुळे सामान्य मुंबईकर या भुलथापांना बळी पडणार नाही हे निश्चित.(Mumbai Municipal Corporation Election)
 
"मुंबईतील मराठी माणसाच्या प्रश्नांवर केवळ भावनिक भाषणांऐवजी ठोस कामे झाली का? हा खरा मुद्दा आहे. अनेक वर्षे सत्तेत असूनही मराठी माणसाचा रोजगार, घर आणि मुंबईतील स्थैर्य याबाबत अपेक्षित बदल घडले नाहीत, ही वस्तुस्थिती आहे. अस्मितेची भाषा वापरली गेली, पण धोरणात्मक निर्णयांचा अभाव जाणवला. याऊलट, मागील काही वर्षांत महायुती सरकारच्या काळात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली मुंबईतील मराठी माणसाच्या हिताचे निर्णय घेण्यात आल्याचे दिसून येते. मोठ्या प्रमाणात गुंतवणूक आल्याने रोजगाराच्या संधी वाढल्या, गृहनिर्माण आणि पुनर्विकास प्रकल्पांमुळे मुंबईत मराठी माणसाला हक्काचे घर मिळू लागले. महायुती सरकारमध्ये मराठी अस्मितेला केवळ निवडणुकीपुरती नाही, तर धोरणात्मक प्रतिष्ठा मिळाली आहे. त्यामुळे आज मुंबईतील मराठी माणूस भावनांपेक्षा प्रत्यक्ष काम, विकास आणि स्थैर्य यावरच आपला निर्णय घेईल, हे स्पष्टपणे दिसून येते."(Mumbai Municipal Corporation Election)
- आमदार प्रसाद लाड
 
 
Powered By Sangraha 9.0