मुंबई : (P. L. Deshpande Maharashtra Kala Academy) सांस्कृतिक कार्य विभाग पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी (P. L. Deshpande Maharashtra Kala Academy) आयोजित पु.ल. कट्टयावर चिनी संस्कृतीच्या गंमती जमती उलगडणार आहे. शुक्रवार दि. २ जानेवारी रोजी सायंकाळी ६ वाजता प्रभादेवीच्या पु.ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी,(P. L. Deshpande Maharashtra Kala Academy) खुला रंगमंचावर हा कार्यक्रम सादर होणार आहे. या कार्यक्रमात शांघाय महाराष्ट्र मंडळाचे माजी अध्यक्ष मनोज कुलकर्णी चिनी भाषा, चिनी कविता, चिनी संस्कृती आणि आपल्या संस्कृतीतील साधर्म्य यावर श्रोत्यांशी संवाद साधणार आहेत. या प्रसंगी शिबानी जोशी, त्यांची मुलाखत घेणार आहेत. सदर कार्यक्रम विनामूल्य असून, श्रोत्यांनी मोठ्या प्रमाणात या कार्यक्रमाला हजेरी लावावी असे आवाहन आयोजकांच्या माध्यमातून करण्यात आले आहे.(P. L. Deshpande Maharashtra Kala Academy)