मुंबई : (Navnath Ban) आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मंगळवार दि.३० रोजी भाजपचे महाराष्ट्र माध्यम प्रमुख नवनाथ बन (Navnath Ban) यांनी मुंबई महानगरपालिका मानखुर्द वॉर्ड क्रमांक १३५ मधून शेकडो समर्थक, कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत आपला उमेदवारी अर्ज अधिकृतपणे दाखल केला.(Navnath Ban)
अर्ज दाखल करताना परिसरात प्रचंड उत्साहाचे वातावरण होते. कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत भाजपच्या विजयाचा निर्धार व्यक्त केला. यावेळी बोलताना नवनाथ बन (Navnath Ban) म्हणाले की, “वॉर्ड क्रमांक १३५ मधील नागरिकांशी माझा थेट आणि सातत्यपूर्ण संवाद आहे. या परिसरातील मूलभूत समस्या, विकासाच्या गरजा आणि नागरिकांच्या अपेक्षा मला पूर्णपणे माहीत आहेत. जनतेच्या विश्वासावर ही निवडणूक लढवत असून, विजयाचा पूर्ण विश्वास मला आहे.”(Navnath Ban)
हेही वाचा : Mumbai bus accident in Bhandup : रात्री नेमकं काय घडलं? मृतांची ओळख पटली, जखमींचीही नावे समोर
"भ्रष्टाचारमुक्त प्रशासन, दर्जेदार नागरी सुविधा, पारदर्शक कारभार आणि वॉर्ड क्रमांक १३५ च्या सर्वांगीण विकासासाठी आपण कटिबद्ध असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील सरकारचे विकासाचे धोरण आणि भाजपची कार्यसंस्कृती घेऊन आपण मतदारांपर्यंत जाणार आहे."असेही ते म्हणाले.(Navnath Ban)
"वॉर्ड क्रमांक १३५ मध्ये भाजपचा विजय निश्चित असून, ही निवडणूक मोठ्या मताधिक्याने जिंकू,."असा ठाम आत्मविश्वास नवनाथ बन (Navnath Ban) यांनी यावेळी व्यक्त केला.(Navnath Ban)