Smriti Mandir : इस्त्रायलचे महावाणिज्यदूत याविन रेव्हाच यांनी 'स्मृती मंदिरा'स दिली भेट

30 Dec 2025 18:37:46
Smriti Mandir

नागपूर : (Smriti Mandir) इस्त्रायलचे महावाणिज्यदूत (कॉन्सुल जनरल) याविन रेव्हाच यांनी नागपूरच्या रेशीमबाग येथील स्मृती मंदिर (Smriti Mandir) परिसरास नुकतीच भेट दिली. या भेटीदरम्यान त्यांना स्मृती मंदिराच्या (Smriti Mandir) ऐतिहासिक, सांस्कृतिक आणि वैचारिक महत्त्वाबाबत माहिती देण्यात आली. स्मृती मंदिर (Smriti Mandir) देशभरातील कोट्यवधी स्वयंसेवकांसाठी प्रेरणास्थान कसे आहे, हे समजावून सांगण्यात आले. संघटनेचा प्रवास आणि संघाशी संबंधित सामाजिक उपक्रम समजून घेण्यात त्यांनी विशेष रस दाखवला. यावेळी नागपूर महानगर कार्यवाह राजेश लोया यांच्यासह संघाचे प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. याविन रेव्हाच यांनी याप्रसंगी म्हटले की, संघाच्या शताब्दी वर्षात नागपूर येथील मुख्यालयास भेट देणे हे माझ्यासाठी सन्मानाची बाब होती. १९२५ मध्ये जिथून सगळ्याची सुरुवात झाली त्या शाखेला मी प्रत्यक्ष पाहिले."(Smriti Mandir)
 
हेही वाचा : Navnath Ban : नवनाथ बन यांनी केला उमेदवारी अर्ज दाखल 
 
 
Powered By Sangraha 9.0