तिकीट मिळत होतं पण नाकारलं! भाजपच्या अक्षता तेंडुलकर यांनी का घेतला असा निर्णय? - वाचा सविस्तर

30 Dec 2025 21:04:14

Akshata Tendulkar 
 
मुंबई : (Akshata Tendulkar) महानगरपालिकांच्या निवडणुका जाहीर झाल्यानंतर उमेदवारीसाठी अनेकांनी या पक्षातून त्या पक्षात उड्या मारल्याचे पाहायला मिळाले. परंतु मुंबईच्या दादर येथून पक्षनिष्ठेचे एक उत्तम उदाहरण समोर आले आहे. भाजपच्या दक्षिण मध्य मुंबई जिल्हा महामंत्री अक्षता तेंडुलकर (Akshata Tendulkar) यांनी हिंदुत्वासाठी उमेदवारी नाकारून पक्ष बदलण्यास नकार दिला. त्यांच्या या निर्णयामुळे सर्वसामान्य नागरिकांमधून कौतुकाचा वर्षाव होत आहे.(Akshata Tendulkar)
 
दादरच्या एकमेव खुल्या वर्गासाठी असलेल्या वॉर्ड क्रमांक १९२ मधून निवडणूक लढवण्यास त्या इच्छुक होत्या, मात्र दादरमधल्या सर्वच जागा महायुतीमध्ये शिवसेनेला देण्यात आल्या. भाजपच्या अनेक नेत्यांनी १९२ वॉर्ड भाजपला लढवण्यास मिळावा यासाठी अतोनात प्रयत्न केले. मात्र महायुतीच्या निर्णयानुसार हा वॉर्ड शिवसेनेला मिळाला. या पार्श्वभूमीवर त्यांना शिवसेनेतून उमेदवारी मिळू शकते अशी शक्यता वर्तवण्यात आली.(Akshata Tendulkar)
 
त्यानुसार एकनाथ शिंदेंनी अक्षता यांच्या कामाची दखल घेत उमेदवारी देण्याची तयारी देखील दाखवली. मात्र अक्षता तेंडुलकर (Akshata Tendulkar) यांनी निर्णय घेतला की, पक्षाच्या वरिष्ठांनी जरी अनुमती दिली असली तरी एका निवडणुकीसाठी मागील दहा वर्षांपासून करत असलेले कार्य, लढा आणि पक्ष यापासून दूर व्हायचे नाही. म्हणून त्यांनी एकनाथ शिंदेंनी दिलेली उमेदवारी नाकारली.(Akshata Tendulkar)
 
हेही वाचा : Mumbai Municipal Corporation Election : 'त्या' अडीच वर्षांनंतर मुंबईतील मराठी माणसासाठी काय बदलले? 
 
अक्षता तेंडुलकर (Akshata Tendulkar) गेली अनेक वर्ष दादर परिसरात स्थानिकांसाठी कार्य करत आहेत. त्यामध्ये अवैध बांगलादेशी घुसखोरांच्या मुद्द्यावर त्यांनी घेतलेली आक्रमक भूमिका पूर्ण मुंबईने पाहिली आहे. दादरच्या मासळी बाजारातील अनधिकृत फेरीवाले हटवण्यासाठी त्यांनी रस्तारोको करत प्रशासनाला कारवाईला भाग पाडले होते.(Akshata Tendulkar)
 
भाजपच्या हिंदुत्वाच्या विचारधारेनुसार मी बांगलादेशी आणि रोहिंग्या घुसखोरीविरोधात लढा दिला आहे, आंदोलने केली आहेत आणि अनेक केसेस देखील घेतल्या आहेत. या निवडणुकीत दादरमधून लढण्याची माझी इच्छा होती. (Akshata Tendulkar) परंतु ते शक्य झाले नसले तरी हिंदुत्व हा माझा पहिला आणि शेवटचा उद्देश असल्याने मी पक्ष बदलणार नसल्याची भूमिका घेतली आहे. हिंदुत्वासाठी सुरू असलेला लढा असाच चालू राहील आणि भविष्यात उमेदवारीची संधी मिळाली तर कमळ चिन्हावरच निवडणुक लढेल.(Akshata Tendulkar)
अक्षता तेंडुलकर, दक्षिण मध्य मुंबई जिल्हा महामंत्री, भाजप
 
 
Powered By Sangraha 9.0