सिंधुदुर्गातील पक्ष्यांच्या यादीत भर; दोन शिकारी पक्ष्यांची प्रथमच नोंद

30 Dec 2025 00:27:01
sindhudurg
मुंबई (विशेष प्रतिनिधी) - सिंधुदुर्ग जिल्ह्यात काळा बाज आणि लांब पायाच्या बाजाचे प्रथमच दर्शन घडले (sindhudurg). त्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या पक्ष्यांच्या यादीत भर पडली असून जिल्ह्यात दिसणाऱ्या पक्ष्यांची संख्या ४२६ झाली आहे (sindhudurg). नोंद करण्यात आलेले बाज कुळातील हे दोन्ही शिकारी पक्षी महाराष्ट्रात हिवाळी स्थलांतरित पक्षी आहेत. (sindhudurg)
 
सिंधुदुर्ग जिल्हा आपल्या पक्ष्याच्या विविधतेसाठी ओळखला जातो. वन अधिवासात राहणाऱ्या दुर्मीळ पक्ष्यांपासून अनेक प्रकारचे पाणपक्षी आणि स्थलांतरी पक्षी देखील जिल्ह्यात आढळतात. आता सिंधुदुर्ग जिल्ह्यात बाज कुळातील काळा बाज आणि लांब पायांचा बाज या शिकारी पक्ष्यांचे प्रथमच दर्शन घडले आहे. पक्षीनिरीक्षक प्रविण सातोसकर यांनी तिलारीतून काळ्या बाजाची, तर वैभव पाटील यांनी लांब पायाच्या बाजाची नोंद केली आहे. हे दोन्ही शिकारी पक्षी महाराष्ट्रात हिवाळी प्रवासी आहेत. म्हणजेच ते हिवाळ्यात स्थलांतर करुन येतात. यातील काळा बाज या पक्ष्याच्या महाराष्ट्रातून तुरळक नोंदी आहेत. काळा बाज हा आकाराने लहान आणि शरीरावरील पिसांची विशिष्ट नक्षी असणारा पक्षी आहे. काळ्या कोटासारखे अंग आणि डोक्यावर लांब, बारीक तुऱ्यासाठी तो ओळखला जातो. यामधील हिमालयात अधिवासा करणारे पक्षी हिवाळ्यात दक्षिणेकडे म्हणजे पश्चिम घाट आणि श्रीलंकेत स्थलांतर करतात.
तर लांब पायांचा बाज हा आकाराने मोठा शिकार पक्षी आहे. हा पक्षी देखील हिवाळ्यात महाराष्ट्रात मध्य आशियामधून स्थलांतर करुन येतो. आपल्या लांब पायांसाठी तो ओळखला जातो. आपल्या लांब पायांसाठी तो ओळखला जातो. महाराष्ट्रात बाज कुळातील वेगवेगळ्या प्रजाती सापडतात. त्यामधील मधुबाज ही प्रजात मधाच्या पोळ्यांवर धाड मारुन त्यामधील मध पिते. घार आणि बाज यांच्यामध्ये शेपटीचा आकार, पंखांचा आकार आणि उडण्याची शैली यामध्ये बराच फरक असतो. बाज हे धष्टपुष्ट असून त्यांची शेपूट ही पंख्यांसारखी असते. तर हवेवर तरंगताना ते पंख 'व्ही' आकारात ठेवतात. याउलट घार ही सडपातळ आणि तिची शेपटी ही लांब टोकदार पंख असलेली असते. ती उडताना चपळतेने उडते आणि बऱ्याचदा अचनाक वळण घेते.
--
Powered By Sangraha 9.0