अंत्योदयाच्या माध्यमातूनच देशाची महासत्तेकडे वाटचाल; राष्ट्रीय संघटन महामंत्री बी एल. संतोष यांचे प्रतिपादन

एकात्म मानव दर्शन राष्ट्रीय संगोष्ठीचे उद्धाटन संपन्न

    30-Dec-2025   
Total Views |
Integral Humanism Seminar in Mumbai
 
मुंबई : ( Integral Humanism Seminar in Mumbai ) पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या अंत्योदयाच्या माध्यमानेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात देश महासत्तेकडे वाटचाल करत आहे, असे प्रतिपादन भाजपचे राष्ट्रीय संघटन महामंत्री बी. एल. संतोष यांनी केले. त्यांच्या हस्ते रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीत दोन दिवसीय एकात्म मानव दर्शन राष्ट्रीय संगोष्ठीचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे व्हिडीओ कॉन्फरंन्सिंगद्वारे आणि कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा उपस्थित होते. मंत्री लोढा यांच्या पुढाकारातून महाराष्ट्र राज्य एकात्म मानवदर्शन हीरक महोत्सव समिती स्थापन करण्यात आली असून या समितीच्या माध्यमाने या दोन दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे.
 
पंडितजींचा मौलिक विचार जनसेवेचा मार्ग निश्चित करणारा
 
"पंडित दीनदयाळ उपाध्याय यांनी ६० वर्षांपूर्वी अंत्योदय आणि एकात्म मानव दर्शन ही विचारधारा मांडली. जोपर्यंत समाजातील शेवटच्या घटकाचा विकास होत नाही, तोपर्यंत विकासाची प्रक्रिया पूर्ण होऊ शकत नाही, पंडितजींचा हा मौलिक विचार जनसेवेचा मार्ग निश्चित करणारा आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
 
हेही वाचा : बांगलादेशच्या पहिल्या महिला पंतप्रधान खालिदा झिया यांचे निधन
 
मंत्री मंगलप्रभात लोढा म्हणाले की, "पंडितजींचे विचार राष्ट्रसेवा आणि राष्ट्रभक्तीची प्रेरणा देणारे असून समाजात हे विचार रुजावेत, हा आमचा संकल्प आहे. दि. २९ आणि ३० डिसेंबर रोजी होणाऱ्या या संगोष्ठी कार्यशाळेत वसुधैव कुटुंबकम, कौशल्य विकास, शिक्षण–प्रशिक्षण, पर्यावरण संवर्धन, महिला सक्षमीकरण आणि एकात्म मानवदर्शनातील समरसता आणि मूल्यशिक्षण या विषयांवर मार्गदर्शन होणार आहे. पंडितजींचे विचार नव्या पिढीसाठी आजही तितकेच मार्गदर्शक आणि दिशादर्शक आहे." रामभाऊ म्हाळगी प्रबोधित आयोजित करण्यात आलेल्या एकात्म मानव दर्शन राष्ट्रीय संगोष्ठी कार्यशाळेत १९ राज्यातील सुमारे २५० प्रतिनिधींनी सहभाग घेतला या दोन दिवसीय सत्रात विविध मान्यवरांचे मार्गदर्शन होणार आहे.
 
 

अवंती भोयर

विज्ञान शाखेतील पदवीनंतर भारतीय जनसंचार संस्थान (IIMC) अमरावतीतून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण. 'दै. मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक या पदावर कार्यरत. शेती, साहित्य, राजकारण या विषयात विशेष रस. हस्तकला, संगीत आणि कविता लेखनाचा छंद....