Mumbai bus accident in Bhandup : रात्री नेमकं काय घडलं? मृतांची ओळख पटली, जखमींचीही नावे समोर

    30-Dec-2025
Total Views |
Bhandup Bus Accident
 
मुंबई : ( Bhandup Bus Accident ) मुंबईतील भांडुप पश्चिम परिसरात सोमवार, दि. २९ रोजी रात्री बेस्ट बसने स्टेशन रोड परिसरात रिव्हर्स घेत असताना चालकाचे नियंत्रण सुटल्याने बसने प्रवाशांना जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात चार जण ठार झाले. तर,अनेक जण जखमी झाल्याची माहिती आहे. जखमींवर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अचानक झालेल्या या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली.
 
दरम्यान, सोमवार, दि.२९ रोजी रात्री सुमारे ९.०५ वाजण्याच्या सुमारास भांडुप स्टेशन रोड परिसरात ही घटना घडली. या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल, स्थानिक पोलीस, बेस्टचे वरिष्ठ कर्मचारी आणि १० रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल झाल्या. मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या अपघातात चार जणांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये पोलीसांनी संबंधित बेस्ट चालकाला ताब्यात घेतले असून पुढील कार्यवाही सुरू केली आहे. मृतांमध्ये तीन महिला आणि एका पुरुषाचा समावेश आहे. तर, जखमींमध्ये एक महिला आणि ८ पुरुषांचा समावेश आहे. या सर्व रुग्णांवर राजावाडी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
 
Bhandup Bus Accident: बेस्ट बस अपघातातील मृतांची व जखमींची माहिती राजावाडी हॉस्पिटल: डॉ तारीख, सीएमओ यांनी माहिती दिली
 
1. प्रणिता संदिप रासम, मृत घोषित
 
2. प्रशांत दत्ताराम लाड, डिस्चार्ज
 
एम टी अग्रवाल: डॉ गायत्री पाटील, एएमओ द्वारे माहिती
 
मृत
 
1. वर्षा सावंत, मृत घोषित
 
2. मानसी मेघश्याम गुरव, मृत घोषित
 
3. प्रशांत शिंदे, AMO डॉ. गायत्री पाटील यांनी मृत आणले
 
हेही वाचा : धारावीतील सुविधा केंद्र मुंबईतील पहिलं नव्हे; सुविधा केंद्र ही संकल्पना आदित्य ठाकरेंची नाही
 
प्रकृती स्थिर
 
1. नारायण भिकाजी कांबळे
 
2. मंगेश मुकुंद धुखंडे
 
३. ज्योती विष्णू शिर्के
 
सायन हॉस्पिटल: डॉ रणधीर सिंग, AMO द्वारे माहिती
 
१.शीतल प्रकाश हाडवे, अल्पवयीन जखमी, प्रकृती स्थिर.
 
२. रामदास शंकर रूपे, किरकोळ जखमी, प्रकृती स्थिर.
 
फोर्टिस हॉस्पिटल: कर्मचारी परिचारिकेकडून माहिती नोंदवली
 
१. प्रताप गोपाल कोरपे, प्रकृती स्थिर
 
हिरा मोंगी हॉस्पिटल मुलुंड (प्रा.वि.): डॉ. साक्षी, सीएमओकडून माहिती नोंदवली
 
१. रवींद्रा सेवाराम घाडीगावकर, प्रकृती स्थिर
 
मिनाझ हॉस्पिटल, भांडुप (प्रा.वि.): डॉ. सुभाष भाटियाकडून माहिती नोंदवली
 
१. दिनेश विनायक सावंत, प्रकृती स्थिर
 
२. पूर्वा संदीप रसम,प्रकृती स्थिर