मुंबई : (Municipal Corporation Election) राज्यातील २९ महानगरपालिकांच्या निवडणूकांच्या (Municipal Corporation Election) पार्श्वभूमीवर संपूर्ण राज्यभरात मोठ्या राजकीय घडामोडी सुरु आहेत. मंगळवारी, रुसवे-फुगवे, नाराजी आणि गोंधळात उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत अखेर संपली. दरम्यान, बंडखोरी आणि राजीनामा सत्रांनी दिवसभर राजकीय वातावरण तापले होते.(Municipal Corporation Election)
अनेक इच्छूक उमेदवारांना पक्षाने तिकीट नाकारल्याने त्यांच्यात तीव्र नाराजी पाहायला मिळाली. यावेळी काही उमेदवारांनी आपल्या निष्ठेचा पाढा वाचला तर, काहींना अश्रू अनावर झाले. काही उमेदवारांनी आत्मदहनाचाही प्रयत्न केला.(Municipal Corporation Election)
नागपूरात राष्ट्रवादीचे कार्यकर्त्ये संतप्त
उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा नागपूरमध्ये स्वबळावर निवडणूका (Municipal Corporation Election) लढत आहे. दरम्यान, बुधवारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या काही कार्यकर्त्यांनी तिकीट न मिळाल्याने पक्षाच्या कार्यालयातील टीव्ही आणि काचा फोडल्या. दुसरीकडे, भाजपच्या नाराज कार्यकर्त्यांनी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या गाडीला घेराव घातला तर, अनेकांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे घर गाठले.(Municipal Corporation Election)
हेही वाचा : भाजप-शिवसेनेचे जागावाटप निश्चित; भाजप १३७ तर शिवसेना ९० जागांवर लढणार
संभाजीनगर येथे हायव्होल्टेज ड्रामा
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजपच्या कार्यालयाबाहेर हायव्होल्टेज ड्रामा पाहायला मिळाला. गेल्या कित्येक वर्षांपासून पक्षाशी एकनिष्ठ असूनही उमेदवारी न मिळाल्याने महिला उमेदवारांनी मोठा गदारोळ घातला. यावेळी एका महिलेला भोवळ आली. पक्षावर नाराजी व्यक्त करताना त्यांना अश्रू अनावर झाले.(Municipal Corporation Election)
पुण्यात उद्धव ठाकरेंचे पोस्टर फाडले
पुणे येथे तिकीट न मिळाल्याने उबाठा गटाच्या नाराज कार्यकर्त्यांनी उद्धव ठाकरे यांचे पोस्टर फाडून आपला रोष व्यक्त केला. तर, मुंबईतही अनेक कार्यकर्त्यांनी मातोश्रीबाहेर ठिय्या मांडला होता.(Municipal Corporation Election)