Mumbai Metro One : नववर्ष स्वागतासाठी मुंबई मेट्रो वनच्या अतिरिक्त सेवा;

30 Dec 2025 16:13:35
Mumbai Metro One
 
मुंबई : (Mumbai Metro One) नववर्षाच्या स्वागतासाठी मुंबईकरांना सुरक्षित, सोयीस्कर आणि सुरळीत प्रवासाची सुविधा मिळावी यासाठी मुंबई मेट्रो वन (Mumbai Metro One) प्रा. लि.कडून ३१ डिसेंबर २०२५ रोजी विशेष सेवा वाढवण्यात आल्या आहेत. या दिवशी मेट्रो वनकडून (Mumbai Metro One) २८ अतिरिक्त फेऱ्या चालवण्यात येणार असून एकूण फेऱ्यांची संख्या ५०४ इतकी असेल.(Mumbai Metro One)
 
एमएमओपीएलकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, यामध्ये ४७६ नियमित आणि २८ अतिरिक्त विशेष फेऱ्यांचा समावेश आहे. प्रवाशांची संभाव्य गर्दी लक्षात घेऊन वेळापत्रकात बदल करण्यात आला आहे.(Mumbai Metro One)
 
नववर्षाच्या पूर्वसंध्येला मोठ्या प्रमाणावर होणारी प्रवासी हालचाल लक्षात घेता या अतिरिक्त सेवा सुरू करण्यात आल्याचे एमएमओपीएलने स्पष्ट केले आहे. प्रवाशांनी प्रवासाची योग्य आखणी करावी व मेट्रो प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहनही करण्यात आले आहे. मुंबई मेट्रो वनतर्फे (Mumbai Metro One) सर्व प्रवाशांना नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या आहेत.(Mumbai Metro One)
 
हेही वाचा : Road Safety Campaign : राज्यभर १ ते ३१ जानेवारी दरम्यान ‘रस्ता सुरक्षा अभियान’
 
सेवेचा तपशील
 
एकूण फेऱ्या: ५०४
 
४७६ नियमित
 
२८ अतिरिक्त
 
गाड्यांची वारंवारता:
 
पीक अवर्समध्ये: दर ३ मिनिटे २० सेकंदांनी
 
ऑफ-पीक अवर्समध्ये: दर ५ मिनिटे ५५ सेकंदांनी
 
अतिरिक्त २८ फेऱ्या: दर १२ मिनिटांनी
 
वर्सोवा येथून रात्री ११.२६ वाजता सुरू
 
घाटकोपर येथून रात्री ११.५२ वाजता सुरू
 
पहिली व शेवटची मेट्रो
 
पहिली मेट्रो:
 
वर्सोवा: सकाळी ५.३०
  
घाटकोपर: सकाळी ५.३०
 
शेवटची मेट्रो (१ जानेवारी २०२६):
 
वर्सोवा: पहाटे २.१४
 
घाटकोपर: पहाटे २.४०
 
 
Powered By Sangraha 9.0