Saksham Tate : सक्षम ताटे हत्येप्रकरणी विवेक विचार मंचाकडून कठोर कारवाईची मागणी
03-Dec-2025
Total Views |
मुंबई : (Saksham Tate) नांदेड येथे आंतरजातीय प्रेमसंबंधातील विरोधातून झालेल्या सक्षम ताटे (Saksham Tate) यांच्या निर्घृण हत्येनंतर त्यांच्या कुटुंबीयांची भेट विवेक विचार मंचतर्फे घेण्यात आली. पिडीत कुटुंबीयांशी सविस्तर चर्चा करून त्यांच्या न्यायलढ्यात पूर्ण साथ देण्याची भावना व्यक्त करण्यात आली.(Saksham Tate)
या संवेदनशील प्रकरणातील आरोपींवर कठोर आणि तातडीने कायदेशीर कारवाई करण्यात यावी तसेच पिडीत कुटुंबाला शासकीय व न्यायालयीन मदत तात्काळ उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी करणारे निवेदन पोलीस अधीक्षक अभिनाश कुमार यांना देण्यात आले.(Saksham Tate)