मुंबई : (Saksham Tate) नांदेड येथे आंतरजातीय प्रेमसंबंधातील विरोधातून झालेल्या सक्षम ताटे (Saksham Tate) यांच्या निर्घृण हत्येनंतर त्यांच्या कुटुंबीयांची भेट विवेक विचार मंचतर्फे घेण्यात आली. पिडीत कुटुंबीयांशी सविस्तर चर्चा करून त्यांच्या न्यायलढ्यात पूर्ण साथ देण्याची भावना व्यक्त करण्यात आली.(Saksham Tate)
या संवेदनशील प्रकरणातील आरोपींवर कठोर आणि तातडीने कायदेशीर कारवाई करण्यात यावी तसेच पिडीत कुटुंबाला शासकीय व न्यायालयीन मदत तात्काळ उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी करणारे निवेदन पोलीस अधीक्षक अभिनाश कुमार यांना देण्यात आले.(Saksham Tate)
हेही वाचा : महापरिनिर्वाण दिनासाठी सेवा-सुविधांची काटेकोर अंमलबजावणी करा — मुख्यमंत्र्यांचे निर्देश
यावेळी विवेक विचार मंचाचे विभाग संयोजक प्रबोधन निकाळजे, ॲड. राहुल डावरे, यशपाल गव्हाळे आणि आप्पासाहेब पारधे उपस्थित होते.(Saksham Tate)