Winter Session : राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन ८ ते १४ डिसेंबर कालावधीत नागपूर येथे पार पडणार

03 Dec 2025 16:57:15
Winter Session
 
मुंबई : (Winter Session) महाराष्ट्र विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन (Winter Session) सोमवार दि. ८ ते रविवार १४ डिसेंबर २०२५ या कालावधीत नागपूरमध्ये पार पडणार आहे. विधिमंडळ कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत मंगळवार दि.३ रोजी निर्णय घेण्यात आला. (Winter Session)
 
विधानभवन येथे आयोजित विधानमंडळ कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीला विधान परिषद सभापती प्रा.राम शिंदे, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, विधानपरिषद उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे, विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे, उच्च व तंत्र शिक्षण व संसदीय कार्यमंत्री चंद्रकांतदादा पाटील, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे,जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखे पाटील, सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलार, आमदार सुधीर मुनगंटीवार,अनिल परब, प्रसाद लाड,भास्कर जाधव, सुनील प्रभु, जितेंद्र आव्हाड, प्रवीण दरेकर, विक्रम काळे, सतेज पाटील, दीपक केसरकर, विधिमंडळाचे सचिव जितेंद्र भोळे व संबंधित अधिकारी उपस्थित होते. (Winter Session)
 
हेही वाचा : Cancer Diagnostic Van Initiative : जिल्ह्यात ५१४३ नागरिकांची कर्करोग तपासणी
 
दिनांक १३ डिसेंबर शनिवार आणि १४ डिसेंबर रविवार या सुट्टीच्या कालावधीत देखील सभागृहाचे कामकाज होणार आहे
बैठकीत अधिवेशनाच्या (Winter Session) नियोजनावर चर्चा करण्यात आली. (Winter Session)
 
 
Powered By Sangraha 9.0