मुंबई : (Rajnath Singh) देशाचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू सरकारी निधीतून बाबरी मशीद बांधू इच्छित होते, परंतु सरदार वल्लभभाई पटेल यांनी त्यांची ही योजना यशस्वी होऊ दिली नाही. असा धक्कादायक खुलासा केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह (Rajnath Singh) यांनी केला. सरदार पटेल यांच्या १५० व्या जयंतीनिमित्त आयोजित ‘एकता मार्च’ अंतर्गत कार्यक्रम गुजरातच्या वडोदरा येथील साधली गावात नुकताच संपन्न झाला. त्यावेळी ते बोलत होते.(Rajnath Singh)
उपस्थितांना संबोधत नेहरूंच्या धर्मनिरपेक्षतेबाबत राजनाथ सिंह (Rajnath Singh) म्हणाले, नेहरू यांनी गुजरातमधील सोमनाथ मंदिराच्या जीर्णोद्धाराचा मुद्दा मांडला तेव्हा पटेल यांनी स्पष्ट केले की मंदिराचे काम वेगळे आहे, कारण त्यासाठी लागणारे 30 लाख रुपये सामान्य जनतेने दान केले होते. एक ट्रस्ट स्थापन करण्यात आला होता आणि या (सोमनाथ मंदिर) कामावर सरकारचा एकही पैसा खर्च झाला नव्हता. त्याचप्रमाणे अयोध्येतील राममंदिरासाठीदेखील सरकारकडून एक रुपयादेखील देण्यात आले नाही; पूर्ण खर्च देशातील जनतेने उचलला. यालाच खरी धर्मनिरपेक्षता म्हणतात.(Rajnath Singh)
पुढे ते म्हणाले, सरदार पटेल पंतप्रधान होऊ शकले असते, परंतु त्यांनी त्यांच्या संपूर्ण कारकिर्दीत कधीही पदाची आकांक्षा बाळगली नाही. नेहरूंसोबत वैचारिक मतभेद असूनही त्यांनी महात्मा गांधींना दिलेल्या शब्दामुळे त्यांच्यासोबत काम केले. त्यांनी दावा केला की 1946 मध्ये नेहरू काँग्रेस अध्यक्ष म्हणून निवडले गेले, कारण गांधींच्या सल्ल्यानंतर पटेल यांनी आपले नामांकन मागे घेतले होते.(Rajnath Singh)
हेही वाचा : Datta Jayanti : पडघा येथील दत्तजयंतीला १२२ वर्षांची परंपरा
काही राजकीय शक्ती पटेल यांच्या वारशाला पुसून टाकू इच्छित होत्या. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महत्त्वपूर्ण भूमिकेमुळे पटेल यांना पुन्हा इतिहासाच्या पानांवर योग्य स्थान मिळाले. जोपर्यंत भाजपा सत्तेत आहे, तोपर्यंत कोणीही पटेल यांचा वारसा लपवू शकत नाही. नेहरूंनी स्वतःलाच भारतरत्न दिले, पण सरदार वल्लभभाई पटेल यांना तेव्हा भारतरत्न का देण्यात आले नाही? पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’ उभारून पटेल यांना योग्य सन्मान दिला, हा खरोखर प्रशंसनीय उपक्रम असल्याचे राजनाथ सिंह म्हणाले.(Rajnath Singh)
भारताच्या एकात्मतेचे खरे शिल्पकार म्हणून सरदार वल्लभभाई पटेल यांचे योगदान अमर राहिले आहे. मात्र पंतप्रधान पदाच्या निवडणुकीत जेव्हा सर्वानुमते सरदार पटेल यांचे नाव सुचवले गेले असतानाही 'नेहरूंची नाराजी देशासाठी चांगली नाही' या महात्मा गांधीजींच्या विचाराखातर सरदार पटेल यांनी आपली उमेदवारी मागे घेतली आणि ते भारताचे गृहमंत्री तथा उपपंतप्रधान झाले. सरदार पटेल यांनी कायमच हिंदू-मुस्लिम प्रश्नात राष्ट्रीय हिताला प्राधान्य दिले आहे. जवाहरलाल नेहरूविषयी राजनाथ सिंह (Rajnath Singh) यांनी केलेला सरकारी निधीतून बाबरी मशीद बांधण्याचा खुलासा धक्कादायकच म्हणावा लागेल.(Rajnath Singh)