Raj Thackeray Meets Sanjay Raut : राज ठाकरे थेट राऊतांच्या घरी पोहोचले, नेमकं काय घडलं?

03 Dec 2025 16:54:35

मुंबई : (Raj Thackeray Meets Sanjay Raut) गेल्या काही महिन्यांपासून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांची प्रकृती अत्यंत खराब होती. ते एका गंभीर आजाराने ग्रस्त होते. संजय राऊत (Raj Thackeray Meets Sanjay Raut) यांनी स्वत: सोशल मीडियावर याबाबत माहिती दिली होती. मात्र काही दिवसांपूर्वीच आजाराचे निदान झाले असून आता त्यांची प्रकृती स्थिर आहे. त्यातच आता राऊतांच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी राज ठाकरे थेट त्यांच्या भांडुपमधील निवास्थानी पोहोचले आहेत. (Raj Thackeray Meets Sanjay Raut)
 
हेही वाचा :  Bharat Taxi : दिल्लीत देशाची पहिली सरकारी 'भारत टॅक्सी' सेवा सुरू!

 
दरम्यान माध्यमांवरून मिळालेल्या माहितीनुसार, याआधीही राज ठाकरे राऊतांच्या (Raj Thackeray Meets Sanjay Raut) संपर्कात होते. ते फोनवरून नेहमी त्यांच्या तब्येतीची विचारपूस करायचे. डॉक्टरांनी राऊतांना सक्तीची विश्रांती घेण्याचा सल्ला दिला होता. त्यामुळे ते एकदीड महिना लोकांमध्ये न मिसळता आराम करत होते. त्यासोबतच राज ठाकरे (Raj Thackeray Meets Sanjay Raut) यांनी त्यांना उपचारासाठी युएसला जाण्याचा सल्ला दिला असल्याचेही समजत आहे. या भेटीदरम्यान, त्या दोघांमध्ये अर्धा-पाऊण तास चर्चा झाली असल्याचे समजत आहे. त्याशिवाय राज ठाकरे हे तब्बल २० वर्षांनी राऊतांच्या घरी गेले होते. (Raj Thackeray Meets Sanjay Raut)
 

Powered By Sangraha 9.0