Constitution Day : संविधान दिनानिमित्त समतादूत कार्यक्रमांचे आयोजन

03 Dec 2025 15:40:16
Constitution Day
 
ठाणे : (Constitution Day) डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था, (बार्टी ) पुणे यांच्यामार्फत संविधान दिनानिमित्त ठाणे जिल्हयामध्ये समतादूत मार्फत संविधान सप्ताह (Constitution Day) साजरा केला जात आहे. उद्घाटन समारोह दि.२६ नोव्हेंबर रोजी संविधान रॅली व उद्देशिका वाचन करून संपन्न झाला. तसेच विविध स्पर्धा, (निबंध, वक्तृत्व प्रश्नमंजुषा, प्रबोधन), पथनाट्यद्वारे संविधान मधील कलम, संविधानाचे महत्व, आपले हक्क, कर्तव्य यावर माहितीपर कार्यक्रम झाला.(Constitution Day)
 
हा कार्यक्रम महसंचालक सुनील वारे, निबंधक विशाल लोंढे, विभाग प्रमुख डॉ.बबन जोगदंड यांच्या मार्गदर्शनाखाली राबविला जात आहे, अशी माहिती बार्टीच्या ठाणे जिल्हा प्रकल्प अधिकारी मेघा मनोज पवार यांनी दिली आहे.(Constitution Day)
 
हेही वाचा : Chief Minister's Samruddh Panchayat Raj Abhiyan : मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानासाठी जिल्हा परिषदांच्या स्वनिधीतून १० टक्के निधी राखीव  
 
संविधानाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त सामाजिक न्याय विभागाच्या वतीने राज्यभर विविध उपक्रम राबविले जात आहेत. त्याच उपक्रमाचा एक एक भाग म्हणून डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी ), पुणे यांच्या विद्यमाने संपूर्ण जिल्ह्यात २६ नोव्हेंबर ते २ डिसेंबर २०२५ या कालावधीत आयोजन करण्यात आले आहे. साप्ताहाची सुरुवात २६ नोव्हेंबर रोजी 'वॉक फॉर संविधान' रॅलीने झाली. या उपक्रमात शेणवे विभाग हायस्कूल, शेणवे, विद्या प्रसारक मंडळ शहा सरूपचंद माध्यमिक व कनिष्ठ विद्यालय, किन्हवली, महात्मा ज्योतिबा फुले आश्रम शाळा, आर के अभ्यंग महाविद्यालय, बहुजन हिताय बहुजन सुखाय बुद्ध विहार, मॉडेल स्कुल, नवी मुंबई महानगरपालिका शाळा क्र. २२ या शाळांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. या शैक्षणिक शाळा, महाविद्यालयांमध्ये संविधान उद्देशिका वाचन, अभिवादन, व्याख्यांनाचे आयोजन करण्यात आले. विद्यार्थ्यांमध्ये संविधान जनजागृती साठी संविधानावर आधारित प्रश्नमंजुषा, निबंध स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, प्रास्ताविकेचे सामूहिक वाचन, चालता बोलता कार्यक्रम अशा विविध उपक्रमाचे आयोजन संपूर्ण आठवडाभर केले आहे.(Constitution Day)
 
हा उपक्रम बार्टीचे महासंचालक सुनील वारे यांच्या संकल्पनेतून राबविण्यात येत असून निबंधक विशाल लोंढे, विभाग प्रमुख डॉ.बबन जोगदंड यांच्या मार्गदर्शनाखाली व प्रकल्प अधिकारी मेघा पवार यांच्या नियोजनात जिल्ह्यातील सर्व समतादूतांच्या माध्यमातून विविध ठिकाणी कार्यक्रमांचे नियोजन कारण्यात आले आहे.सामाजिक बांधिलकी वाढविणे, हे या सप्ताहाचे उद्दिष्ट आहे.(Constitution Day)
 
 
Powered By Sangraha 9.0