Chandrashekhar Bawankule : नाना पटोले यांना प्रत्येक गोष्टीत राजकारण दिसते, निवडणूक आयोगाने केलेल्या घोळाशी शासनाचा संबंध नाही

निवडणूक आयोगाच्या भूमिकेशी आम्ही असहमत, निवडणुका पुढे ढकलू नका म्हणून आयोगाला चार वेळा पत्रव्यवहार, शासनाने आपली स्पष्ट भूमिका मांडली

    03-Dec-2025
Total Views |
Chandrashekhar Bawankule
 
नागपूर : (Chandrashekhar Bawankule) राज्यातील काही नगरपालिका आणि नगर पंचायतींच्या निवडणुका मतदानाच्या एक दिवस आधीच पुढे ढकलण्याचा निर्णय निवडणूक आयोगाने घेतला. आयोगाच्या या भूमिकेशी राज्य शासन असहमत असल्याचे महसूलमंत्री (Chandrashekhar Bawankule) तथा नागपूर आणि अमरावती जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी स्पष्ट केले.महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule)प्रसार माध्यमांशी बोलत होते.
 
निवडणुका पुढे ढकलू नयेत म्हणून शासनाने आयोगाशी चार वेळा पत्रव्यवहार केला होता. मात्र, नाना पटोले निवडणूक आयोगाच्या घोळासाठी शासनाला जबाबदार धरत आहेत. त्यांना प्रत्येक गोष्टीत राजकारणच दिसते, अशी टीका त्यांनी केली निवडणूक आयोगाच्या निर्णयावर सर्वच पक्षांचे नेते नाराजी व्यक्त करत आहेत. आयोगाने निवडणुका पुढे ढकलू नयेत, ही आमची ठाम भूमिका आहे. आम्ही सरकार म्हणून आमचे धोरण स्पष्ट केले असून, आयोगाची भूमिका चुकीची असल्याचेही त्यांनी सांगितले.(Chandrashekhar Bawankule)
 
हेही वाचा : Sheetal Tejwani : शीतल तेजवानी यांना अटक  
 
अतिवृष्टीग्रस्तांना केंद्राकडून मदत मिळण्याबाबत ते म्हणाले की, केंद्र सरकारचे पथक नुकसानीची पाहणी करून गेले आहे. राज्य सरकार प्रस्ताव पाठवते आणि केंद्र सरकार त्याचा अंतिम निर्णय करते. त्यानंतर अंतिम गोषवारा तयार होतो. हा गोषवारा लवकरच अंतिम होईल आणि राज्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मोठी मदत मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.कामठी नगरपरिषदेची निवडणूक रद्द करण्याच्या मागणीबाबत बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) म्हणाले की, न्यायालयात याचिका दाखल करणे हा प्रत्येक नागरिकाचा अधिकार आहे. न्यायालयच यावर अंतिम निर्णय देईल. 
 
स्थानिक निवडणुकीत काही ठिकाणी महायुतीमध्ये नाराजीची प्रकरणे झाली असली तरी त्याचा महायुतीच्या एकूण घडामोडींवर कोणताही परिणाम होणार नाही. स्थानिक स्तरावर झालेल्या नाराजीचे पडसाद महायुतीच्या स्थैर्यावर पडणार नाहीत, असे त्यांनी स्पष्ट केले. आमच्या प्रदेशाध्यक्षांनी दिलेला २ तारखेचा अल्टीमेटम हा फक्त स्थानिक निवडणुकांच्या संदर्भात होता, राज्यातील महायुतीबाबत नव्हता, असेही त्यांनी नमूद केले.(Chandrashekhar Bawankule)