Maharashtra Winter Session 2025 : महाराष्ट्राच्या हिवाळी अधिवेशनाच्या तारखा जाहीर! यंदा फक्त आठवडाभर चालणार अधिवेशन

03 Dec 2025 15:04:03
Maharashtra Winter Session 2025

मुंबई : (Maharashtra Winter Session 2025)
महाराष्ट्र विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन ८ ते १४ डिसेंबरदरम्यान होणार असल्याचे विधिमंडळ कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत ठरले. त्यामुळे यंदा नागपूरमध्ये होणारे हिवाळी अधिवेशन आठवडाभरच चालणार आहे. एक आठवडाभरच हिवाळी अधिवेशन ठेवल्याने विरोधकांमध्ये नाराजीचा सुरु उमटताना दिसून येत आहे.
या बैठकीला मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्यासह दोन्ही सभागृहांचे अध्यक्ष आणि विरोधी पक्षांचे प्रमुख नेते उपस्थित होते. या अल्प कालावधीत पुरवणी मागण्यांवर चर्चा, कायदे आणि नियम तयार करणे, तसेच सार्वजनिक हिताच्या विषयांवर चर्चा केली जाईल. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमुळे राज्यात आचारसंहिता लागू असल्याने, सरकारला कोणतीही मोठी घोषणा करण्यावर निर्बंध असतील.
Powered By Sangraha 9.0