Maharashtra Local Body Election : दुसऱ्या टप्प्यात महापालिका निवडणुका होणार?

03 Dec 2025 12:39:12
 
Maharashtra Local Body Election
 
मुंबई : (Maharashtra Local Body Election) सध्या राज्यभरात नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकींची लगबग सुरू आहे. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीचा (Maharashtra Local Body Election) पहिला टप्पा मंगळवारी पार पडला. तर, काही नगर परिषद, नगर पंचायतीच्या निवडणुका २० डिसेंबर रोजी पार पडणार होत्या. या निवडणुकांचा निकाल आता २१ डिसेंबर रोजी जाहीर होणार आहे. मात्र आता दुसऱ्या टप्प्यात महापालिकेच्या निवडणुका घेतल्या जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. (Maharashtra Local Body Election)
 
हेही वाचा :  ‘दित्वाह’च्या निमित्ताने...
 
या संदर्भात निवडणूक आयोगाने गुरूवार दि. ४ डिसेंबर रोजी २९ मनपा आयुक्तांची बैठक बोलावली आहे. आता या निवडणुका १५ ते २० डिसेंबर दरम्यान जाहीर होण्याची शक्यता आहे. (Maharashtra Local Body Election)
 
 
Powered By Sangraha 9.0