मुंबई : (Devendra Fadnavis Meets Sanjay Raut) राज्यातील राजकीय वर्तुळातून मोठी बातमी समोर येत आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Devendra Fadnavis Meets Sanjay Raut) यांची भेट झाली असल्याच माध्यमांवरून समजत आहे. एका खासगी कार्यक्रमात ही भेट झाली दरम्यान, त्यांच्यात २० मिनिटे चर्चा देखील झाली. यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी संजय राऊत (Devendra Fadnavis Meets Sanjay Raut) यांच्या प्रकृतीची विचारपूस केली.
संजय राऊत यांची प्रकृती गेल्या काही महिन्यांपासून अत्यंत खराब होती. ते एका गंभीर आजाराने ग्रस्त होते. संजय राऊत यांनी स्वत: सोशल मीडियावर याबाबत माहिती दिली होती. डॉक्टरांनी त्यांना सक्तीची विश्रांती घेण्याचा सल्ला दिला होता. या आजारावर उपचार करण्यासाठी संजय राऊत यांनी काही दिवस सार्वजनिक जीवनापासून दूर राहणार असल्याचेही सांगितले होते. मात्र काही दिवसांपूर्वीच आजाराचे निदान झाले असून आता त्यांची प्रकृती स्थिर आहे. (Devendra Fadnavis Meets Sanjay Raut)
दरम्यान, मंगळवार दि. २ डिसेंबर रोजी मुंबईत झालेल्या एका खासगी कार्यक्रमात संजय राऊत यांनी बऱ्याच दिवसांनी उपस्थिती दर्शवली होती. या कार्यक्रमात देवेंद्र फडणवीस आणि आशिष शेलार उपस्थित होते. यावेळी संजय राऊत आणि देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis Meets Sanjay Raut) यांनी एकमेकांशी चर्चा केली असल्याचे आता समजत आहे.