Datta Jayanti : पडघा येथील दत्तजयंतीला १२२ वर्षांची परंपरा

03 Dec 2025 18:34:20
(Datta Jayanti)
 
मुंबई : (Datta Jayanti) भिवंडीच्या पडघा येथील श्री दत्त देवस्थान मंदिरात (Datta Jayanti) दरवर्षी प्रमाणे यंदाही दत्त जयंती (Datta Jayanti) उत्सव मोठ्या उत्साहात संपन्न होत आहे. यंदाचे १२२ वे वर्ष असून दि. २९ नोव्हेंबर पासून ते ५ डिसेंबर या कालावधीत गुरुचरित्र पारायण सोहळा संपन्न होत आहे. आज गुरुवार, दि. ०४ डिसेंबर रोजी सकाळी ६ वा. काकड आरती होईल, त्यानंतर ८ ते १०.३० यावेळेत सामुहिक गुरुचरित्र पारायण संपन्न होऊन 'भिक्षा' कार्यक्रम संपन्न होईल. त्याचबरोबर संध्याकाळी ६ वा. डोंबिवलीचे कीर्तनकार मंदार व्यास यांच्या प्रमुख उपस्थितीत श्री दत्त जन्माचे कीर्तन होईल. रात्री १० वा. नाट्य व भक्ती गीतांची सुरेल मैफलचा आस्वाद घेता येणार आहे.(Datta Jayanti)
 
गुजरातच्या उंबरगावचे‌ कारुळकर‌ यांनी हे पडघा गाव वसवले आहे. श्री‌.दत्त संस्थान मंदिर पडघे (Datta Jayanti) या देवस्थानाला चाफेकर बंधू यांनी वास्तू दान देऊन या वास्तूमध्ये पहिल्यांदा चाफेकर बंधू यांनी पादुकांची स्थापना करून उत्सव साजरा केला होता. १९६० साली राजस्थान येथून मुर्ती आणून या मुर्तीची विधीवत प्राणप्रतिष्ठा झाल्यानंतर येथील उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा होऊ लागला. (Datta Jayanti) संस्थानच्या शतकमहोत्सवी वर्षी विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. गावातून मोठी शोभायात्रा देखील तेव्हा निघाली होती. अशी माहिती देवस्थानचे प्रमुख विश्वस्त रवी कराडकर यांनी दिली.(Datta Jayanti)
 
शुक्रवारी सकाळी ८ ते १०.३० या वेळेत सामुहिक श्रीगुरुचरित्र (Datta Jayanti) पारायणाची सांगता होईल. दुपारी १२ ते ३ यावेळेत भाविकांना महाप्रसादाचा लाभ घेता येईल. त्यानंतर संध्याकाळी ६ वा. श्रींची पालखी निघेल आणि रात्री ११ वा. कीर्तनकार मंदार व्यास यांच्या लळीताचे कीर्तन याने उत्सवाची सांगता होईल.(Datta Jayanti)
 
Powered By Sangraha 9.0