मुंबई : (Bharat Taxi) आता देशातील चालकांना खासगी ॲप कंपन्यांवर अवलंबून राहण्याची गरज नाही. कारण केंद्र सरकारने एक मोठे पाऊल उचलत, 'भारत टॅक्सी' (Bharat Taxi) अॅपचा पायलट प्रोजेक्ट मंगळवार दि २ डिसेंबरला राजधानी दिल्लीत सुरू केला आहे. या अॅपमध्ये कार, ऑटो आणि बाईक या तिन्ही प्रकारच्या राईड्स बुक करण्याची परवानगी आहे. आतापर्यंत या ॲपवर ५१,००० हून अधिक चालकांनी नोंदणी केली आहे. त्यासोबतच ही टॅक्सी सेवा शून्य कमिशन मॉडेलवर चालणार आहे. (Bharat Taxi)
हेही वाचा : Thane Municipal Corporation : ठाणे महापालिका लोकशाही दिनाचे आयोजन
केंद्रीय मंत्री अमित शाह हे लोकसभेत 'भारत टॅक्सी'बद्दल (Bharat Taxi) बोलताना म्हणाले की, "भारत टॅक्सी' (Bharat Taxi) डिसेंबर २०२६ पर्यंत देशभरात लाँच होणार आहे. हे ॲप सहकार टॅक्सी कोऑपरेटिव्ह लिमिटेड द्वारे चालवले जाईल. त्यासोबतच, या प्लॅटफॉर्मचे उद्दिष्ट म्हणजे, खाजगी ॲप्सद्वारे आकारल्या जाणाऱ्या उच्च कमिशनपासून ड्रायव्हर्सचे संरक्षण करणे आणि त्यांना अधिक कमाई करण्याची संधी प्रदान करणे आहे."(Bharat Taxi)
हे वाचलात का ? : Constitution Day : संविधान दिनानिमित्त समतादूत कार्यक्रमांचे आयोजन
'भारत टॅक्सी'च्या (Bharat Taxi) चालकांना प्रत्येक राईडसाठी पूर्ण भाडे मिळणार आहे म्हणजेच ॲप कोणत्याही प्रकारचे कमिशन कापणार नाही. ड्रायव्हर जे काही कमावेल ते थेट त्यांच्या खात्यात जाईल. शिवाय, प्रवाशांना कमी भाड्यात सुरक्षित, विश्वासार्ह प्रवास देखील मिळेल. दिल्लीसोबतच आता गुदरामध्येही चालकांची नोंदणी सुरू आहे. त्यामुळे आता ही सेवा लवकरच संपूर्ण देशभरात सुरू केली जाणार आहे. (Bharat Taxi)