मुंबई : (Asiatic Elections) दोन शतकाहून अधिक काळ अभ्यासकांच्या सेवेत असलेली एशियाटिक सोसायटी मागच्या काही काळात निवडणुकीमुळे (Asiatic Elections) वादाच्या भोवऱ्यात सापडली होती. दि. ०७ नोव्हेंबर रोजी झालेल्या व्यवस्थापन समितीच्या बैठकीमध्ये समितीकडून निवडणूक पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला होता. अशातच आता ०३ डिसेंबर रोजी पार पडलेल्या व्यवस्थापन समितीच्या बैठकीमध्ये सुद्धा हा प्रश्न निकालात निघाला नाही. (Asiatic Elections)
मागच्या काही काळापासून एशियाटिक सोसायटीची निवडणूक (Asiatic Elections) २० डिसेंबर रोजी पार पडणार असल्याची चर्चा सुरू होती. मात्र, मतदारांची यादी अद्यायावत नसल्यामुळे आता ही तारीख सुद्धा पुढे ढकलली जाणार की काय असा प्रश्न काही सभासदांनी विचारला आहे. यासंदर्भात कुठलीही अधिकृत घोषणा सोसायटीच्या माध्यमातून केली गेली नसली तरी एशियाटिकच्या निवडणुकीवर काळे ढग अद्यापही कायम आहे असेच म्हणावे लागेल. (Asiatic Elections)
" एशियाटिक सोसायटीची निवडणूक (Asiatic Elections) लवकरात लवकर पार पडावी अशी आमची सुद्धा इच्छा आहे मात्र, मतदारांची यादी अद्ययावत केल्याशिवाय निवडणूक घेतली जाऊ शकत नाही. मतदारांच्या यादीमध्ये कोणतीही त्रुटी आढळून येता कामा नये हाच आमचा मानस आहे. काम करणारा कर्मचारी वृंद कमी असल्यामुळे या कामाला वेळ लागतो आहे " (Asiatic Elections)
मुंबईच्या डी.जी. रुपारेल महाविद्यालयातून इतिहास आणि राज्यशास्त्र विषयात पदवी प्राप्त.
राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर शिक्षण. आकाशवाणीच्या युवा वाणी साठी विविध विषयांवर कार्यक्रम सादर केले.वाचनाची आवड. कथाकथन, काव्य वाचन,कथा लेखन यात विशेष रुची तसेच पुरस्कार प्राप्त. महाविद्यालयात असताना, नाटकात काम केले त्याच सोबत नाट्यलेखनाचा अनुभव.