डोंबिवली : (Ashok Dixit) श्रीलंका येथे झालेल्या जागतिक पॉवरलिफ्टिंग स्पर्धेत कल्याणच्या ६४ वर्षीय अशोक दीक्षित (Ashok Dixit) यांनी दोन सुवर्ण पदके मिळविली.सदर स्पर्धा २८ ते ३० नोव्हेंबर २०२५ या कालावधीत पॉवर लिफ्टिंग श्रीलंका ह्यांनी वर्ल्ड पॉवरलिफ्टिंगच्या मान्यतेने आयोजित केली होती. (Ashok Dixit)
हेही वाचा : Saksham Tate : सक्षम ताटे हत्येप्रकरणी विवेक विचार मंचाकडून कठोर कारवाईची मागणी
कल्याणच्या अशोक दिक्षित (Ashok Dixit) यांनी डेडलिफ्ट मध्ये सुवर्ण पदक प्राप्त केले तसेच संपूर्ण पॉवर लिफ्टिंगमध्ये सुध्दा सुवर्ण पदक मिळवून भारत देशाची शान वाढविली. अशोक दीक्षित (Ashok Dixit) हे कल्याण येथील नमस्कार मंडळ येथे सराव करतात.आता पर्यंत त्यांनी २०२ स्पर्धांमध्ये ११३ सुवर्ण २४ रौप्य आणि २७ कांस्य अशी एकूण १६४ पदके पटकावली आहेत. नमस्कार मंडळ कल्याण येथील प्रशिक्षक श्रीबास गोस्वामी ह्यांच्याकडे ते सराव करतात. (Ashok Dixit)